ETV Bharat / bharat

दिल्ली दारू घोटाळा : भाजपाला मला अटक करायचं आहे, अरविंद केजरीवालांचा मोठा आरोप - ईडी चौकशी

Arvind kejriwal On Bjp : दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिसऱ्यांदा समन्स दिलं आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांनी चौकशीकडं पाठ फिरवली आहे. ईडीच्या समन्सविरोधात त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप केले आहेत.

Arvind kejriwal On Bjp
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 3:09 PM IST

नवी दिल्ली Arvind kejriwal On Bjp : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं तिसऱ्यांदा समन्स देऊनही ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजापावर मोठा आरोप केला आहे. "भाजपाला मला अटक करायचे आहे" असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळं ईडी चौकशीवरुन आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचं स्पष्ट होत आहे.

भाजपाला मला अटक करायचं आहे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी "ईडीनं मला तब्बल तीन वेळा समन्स पाठवलं आहे. मात्र भाजपाला मला अटक करायचं आहे. त्यांना माझी बदनामी करायची आहे. माझ्या प्रामाणिकपणावर हल्ला करायचा आहे. माझ्या वकिलानं ईडीनं पाठवलेलं समन्स बेकायदेशीर असल्याचं मला सांगितलं आहे. त्यामुळं बेकायदेशीर समन्स आल्यावर त्याचं पालन कसं करायचं, योग्य समन्स आल्यास मी पालन करेन" असंही अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीचं समन्स : "लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीचं समन्स पाठवलं जात आहे. आठ महिन्यांपूर्वी मला सीबीआयनं बोलावलं होतं. तेव्हा मी गेलो होतो, त्यावेळी काहीही निष्पन्न झालं नाही. मी लोकसभा निवडणुकीत प्रचार करू नये, यासाठी मला चौकशीच्या बहाण्यानं अटक करण्याचा भाजपाचा डाव आहे. भाजपानं विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात ईडी आणि सीबीआय तपास केला. त्यानंतर त्यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन प्रकरणं दडपली गेली. जो भाजपात जात नाही तो तुरुंगात जातो." असा हल्लाबोल अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. दिल्ली दारू घोटाळा : अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडी छापेमारीची आप नेत्यांनी वर्तवली शक्यता
  2. Kejriwal bungalow renovation case : मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, बंगला नूतनीकरण प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.