बैतूल (म.प्र) - अंचल बैतूल आदिवासी भागातील भैंसदेहीमध्ये अनेक दुर्गम ( Scooty wali madam ) भाग आहेत जिथे मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप धोका पत्करावा लागतो. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी ( aruna mahale bring students on scooty ) संख्या वर्षानुवर्षे सातत्याने घटत आहे. भैंसदेहीमधील शाळा जवळपास बंद पडण्याच्याच मार्गावर होती. मात्र, या सरकारी शाळेत विद्यार्थी पुन्हा येऊ लागल्याने ( Scooty wali madam betul MP ) शाळा सुरू राहिली आहे. एका स्कुटी चालक महिला शिक्षिकेमुळे हे सगळे ( aruna mahale betul MP ) शक्य झाले आहे.
रोज स्कूटीने मुलांना शाळेत सोडते-आणते - साधारणपणे मुलांना शाळेत नेणे आणि परत आणणे ही त्यांच्या पालकांची जबाबदारी असते. किंवा मुले स्वतःच त्यांच्या शाळेत जाता येतात. पण भैंसदेहीतील शाळेची शिक्षिका रोज स्कुटीने मुलांच्या घरी जाऊन त्यांना शाळेत घेऊन जाते आणि शाला सोडल्यानंतर त्यांना घरी सोडले. शाळेतील मुलांना शाळेत घेऊन जाते. शाळा संपल्यानंतर ती त्यांना घरी सोडते. अरुणा महाले असे या स्कूटी चालक शिक्षिकेचे नाव आहे. त्या मागील 7 वर्षांपासून हे काम करत आहे. यासाठी त्यांचे कौतुक होत आहे.
शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती, मग..- अरुणा महाले या बैतूल जिल्ह्यातील भैंसदेही ब्लॉकच्या धुडिया गावात कार्यरत आहेत. दुर्गम भूभागामुळे 7 वर्षांपूर्वी केवळ 10 मुलेच शाळेत राहिली. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. हे पाहून अरुणाने काहीतरी नवीन करायचे ठरवले आणि आपल्या स्कूटीच्या सहाय्याने मुलांना शाळेत आणायला सुरुवात केली. हळुहळू अरुणाने शाळेत न येणार्या सर्व मुलांना वर्गात आणण्याचे काम सुरू केले. त्यामुळे आज या शाळेतील मुलांची संख्या 85 झाली आहे. शासनाने ही शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
स्कूटीने मुलांना शाळेत आणतात - अरुणा रोज सकाळी स्कूटीने मुलांना शाळेत आणतात. कच्च्या पक्क्या रस्त्यांवरून होत त्या मुलांना रोज शाळेत आणतात आणि मग शाळा सुटल्यावर त्यांनी घरी वापसही सोडतात. त्यामुळे, त्यांचा बराच वेळ आणि पैसा खर्च होतो. पण, अरुणाला स्वतःचे एकही मूल नसल्यामुळे ती प्रत्येक मुलावर प्रेम करत आहे. मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अरुणा एखाद्या देवदूतासारखीच झाली आहे.
स्वत:च्या खर्चातून शालेय वस्तू घेऊन देतात - शिक्षिका अरुणा महाले यांनी आपल्या शाळेत अतिथी शिक्षक ठेवले आहे. अरुणा आपला पगारातून या शिक्षकाला मानधन देतात. इतकेच नाही तर, शाळेत जर एखाद्या मुलाकडे इरेजर, पेन्सिल किंवा बुक नसेल तर त्या मुलांनाही या वस्तू विकत घेऊन देतात. अरुणा महाले यांनी ७ वर्षांत मुलांच्या कुटुंबाकडून एकही रक्कम घेतलेली नाही. मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी अरुणा खूप प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. अरुणा यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - Cub Died : बिबट्याच्या पिल्लाचा संशयास्पद मृत्यू, नाहरगढ बायोलॉजिकल पार्कमधील घटना