ETV Bharat / bharat

लष्कराला मिळणार १३०० भारतीय बनावटीच्या गाड्या; संरक्षण मंत्रालयाची माहिती - संरक्षण मंत्रालय महिंद्रा करार

पुढील चार वर्षांमध्ये ही वाहने बनवून देण्याचे या करारात सांगण्यात आले आहे. लाईट स्पेशलिस्ट व्हेईकल हे आधुनिक लढाऊ वाहन आहे. यारुन मध्यम मशीन गन्स, ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉंचर आणि अँटी टँक गायडेड मिसाईल्स वाहून नेण्याची क्षमता या वाहनांमध्ये असते, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे..

Army to get 1300 made in India specialist vehicles
लष्कराला मिळणार १३०० भारतीय बनावटीच्या गाड्या; संरक्षण मंत्रालयाची माहिती
author img

By

Published : Mar 22, 2021, 7:04 PM IST

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने सोमवारी महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स लिमिटेड (एमडीएसएल) कंपनीसोबत एक हजार कोटींचा करार केला. या करारांतर्गत लष्कराला १,३०० लाईट स्पेशलिस्ट व्हेईकल्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही सर्व वाहने पूर्णपणे भारतीय बनावटीची असणार आहेत.

चार वर्षांमध्ये मिळणार सर्व वाहने..

पुढील चार वर्षांमध्ये ही वाहने बनवून देण्याचे या करारात सांगण्यात आले आहे. लाईट स्पेशलिस्ट व्हेईकल हे आधुनिक लढाऊ वाहन आहे. यारुन मध्यम मशीन गन्स, ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉंचर आणि अँटी टँक गायडेड मिसाईल्स वाहून नेण्याची क्षमता या वाहनांमध्ये असते, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

आत्मनिर्भर भारत..

या वाहनांचे डिझाईन एमडीएसएलने केले आहे. ही लढाऊ वाहने छोट्या शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित, तसेच अत्यंत अत्यंत चपळ आहेत. यासोबतच युद्धादरम्यान छोट्या स्वतंत्र तुकड्यांना मदत करण्यासाठी ही वाहने उपयोगी ठरणार आहेत. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या असलेली ही वाहने 'आत्मनिर्भर भारत अभियाना'चा एक भाग होतील. तसेच, 'मेक इन इंडिया' या मोहीमेलाही यामुळे चालना मिळणार आहे.

हेही वाचा : विरशो बायोटेक स्पुटनिक व्हीच्या २० कोटी लशींचे करणार उत्पादन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.