ETV Bharat / bharat

कोरोना जागृतीसाठी 120 वर्षीय आजींचा सैन्याने केला गौरव - लष्कराने केला गौरव

कोरोना संकटापासून वाचवण्कोयासाठी देशभरात लसीकरण सुरू आहे. जम्मू-कश्मीरमधील डूडू गावाच्या 120 वर्षीय ढोली देवीने कोरोनाचे लसीकरण करण्यासाठी लोकांमध्ये सजजागृती करण्याचे काम करत आहे. परिणामी, संपूर्ण गावाने लसीकरण केले असून त्याबद्दल भारतीय सैन्याकडून गौरवण्यात आले.

कोरोना जागृतीसाठी सन्मान
कोरोना जागृतीसाठी सन्मान
author img

By

Published : May 22, 2021, 11:34 AM IST

श्रीनगर - उत्तरी सैन्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी जम्मू-काश्मीरच्या उधमपूरच्या तहसील दुदू येथील गर कटियास या गावाला भेट दिली. या दरम्यान, कोविड लसीकरण मोहिमेसाठी लोकांना जागरूक करण्यासाठी त्यांनी गावातील 120 वर्षांच्या ढोली देवींचा गौरव केला.

ढोली देवीचा केला सैन्याने गौरव

लेफ्टनंट जनरल जोशी म्हणाले की, ढोली देवी या वयात चांगल्या आरोग्याचे एक जिवंत उदाहरण आहे. ते म्हणाले की कोरोना वातावरणात एकीकडे शहरी भागातील सुशिक्षित लोकही अनेकदा कोविड लसीकरणाबद्दल संकोच करतात. मात्र, या 120 वर्षीय महिलेने स्थानिक लोकांना लसीकरण करण्यास प्रवृत्त केले. तसेच 17 मे रोजी लसीकरण मोहिमेचे नेतृत्व केले. यामुळेच संपूर्ण गाव लसीसाठी पुढे आले.

लेफ्टनंट जनरल यांनी ग्रामीण आरोग्य कर्मचार्‍यांशी बोलून लोकांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल आणि जम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागात कोरोना लसीकरण मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल कौतुक केले.

जम्मू-काश्मीरच्या केंद्र शासित प्रदेशातील भारतीय लष्कर कोविड -१ या लसीकरण मोहिमेसाठी लढा देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहेय त्याच वेळी लोकांना कोरोना साथीच्या रोगाबद्दल जागरूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमही सुरू केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.