ETV Bharat / bharat

Army helicopter crashes in TamilNadu : तामिळनाडूमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकाॅप्टर दुर्घटनाग्रस्त

कुन्नूर च्या वेलिंगटन आर्मी सेंटर येथे प्रशिक्षणा दरम्यान एक हेलीकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. सेना आणि पोलिस रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. सीडीएस बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबिय या हेलिकॉप्टरमध्ये होते असे समजते.

helicopter crashes
हेलीकाॅप्टर दुर्घटनाग्रस्त
author img

By

Published : Dec 8, 2021, 1:52 PM IST

Updated : Dec 8, 2021, 2:42 PM IST

चेन्नई : कुन्नूरच्या वेलिंगटन आर्मी सेंटर येथे प्रशिक्षणा दरम्यान एक हेलीकॉप्टर हाॅटेल जवळ दुर्घटनाग्रस्त झाले आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. एएनआय वृत्तस्थेने स्पष्ट केले आहे की, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांच्या परिवारातील काही सदस्य या हेलिकाॅप्टरमधे होते. सेना आणि पोलिस शोधमोहीम राबवत आहेत. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी, मधुलिका रावत, ब्रि. एल.एस. लिड्डर, ले. कर्नल हरजिंदर सिंग, एन.के. गुरुसेवक सिंग, ए.के. जितेंद्र कुमार, विवेक कुमार, एलल. के. साई तेजा, सतपाल यांचा समावेश होता.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. स्थानिक लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांना सांगण्यात आले की स्थानिकांनी 80 टक्के भाजलेले दोन मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेले आहेत. अपघाताच्या ठिकाणी उतारावर काही मृतदेह दिसत आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचे आणि ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Last Updated : Dec 8, 2021, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.