कुपवाडा - दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न लष्कराने गुरुवारी रात्री हाणून पाडली. या मोहीमेत लष्काराने एका दहशतवाद्याला यमसदनी पाठवले. या दहशतवाद्यांकडून एक एके सिरीजची बंदूक, त्यासह काडतुसांनी भरलेली सहा मॅगझीन जप्त करण्यात आल्या आहेत. पाकीस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. मात्र लष्करी जवान हा प्रयत्न हाणून पाडत आहेत.
तीन दहशतवाद्यांनी केला घुसखोरीचा प्रयत्न : जम्मू काश्मीर खोऱ्यातील तंगधार सेक्टरमधील सीमारेषेवर गुरुवारी रात्री तीन घुसखोरांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबतची माहिती लष्कराला जम्मू काश्मीर पोलिसांकडून मिळाल्याने त्यांनी शोधमोहीम राबवली. यावेळी लष्करी जवानांना प्रत्यक्ष सीमारेषेवर पाकीस्तानचे घुसखोर घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. यावेळी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये तकमक उडाली. यात लष्करी जवानांनी केलेल्या गोळीबारात दहशतवादी गंभीर जखमी झाले. मात्र अंधाराचा फायदा घेत त्यांनी पाकीस्तानच्या हद्दीत पळ काढला.
एका दहशतवाद्याचा सापडला मृतदेह : जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्करी जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र अंधाराचा फायदा घेत काही दहशतवादी पळ काढण्यात यशस्वी झाले. तर सकाळी पुन्हा लष्करी जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. यात एका दहशतवाद्याचा मृतदेह आढळून आला आहे. या दहशतवाद्याकडे एक एके सिरीजची बंदूक, एक लाईट अॅटोमॅटीक वेपन, 6 मॅगझीन, दोन ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळून आली.
पाकीस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरूच : पाकीस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये सतत घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने पाकीस्तानकडून होणारे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडले जात आहे. गुरुवारी मध्यरात्री पाकीस्तानाकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. मात्र अगोदरच सतर्क असलेल्या लष्करी जवानांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. पाकीस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने घुसखोरी करुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र लष्करी जवान दहशतवाद्यांचा हा डाव हाणून पाडत असल्याची माहिती लष्करी जवानांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात : गेल्या काही दिवसापासून दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय लष्करी जवानांनी तीन दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मात्र पाकीस्तानच्या सीमेकडून दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. भारतीय लष्करी जवानांनी सीमेपलिकडून भारतीय हद्दीत ड्रोनद्वारे शस्त्र आणि ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या ड्रोनमधून चीनी बनावटीची अनेक पिस्तूल आणि 3 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
हेही वाचा -Tamilnadu Crime : सैनिक पत्नीशी झालेल्या वादाच्या रागात नगरसेवकाकडून सैनिकाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू