नवी दिल्ली : अॅपल आयफोनची (Iphone) क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्याकडे आयफोन असावा असे प्रत्येकाला वाटत असते. महागडा असला तरी आता अनेक जण आयफोन वापरत आहे. या आयफोन युजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. लवकरच आयफोन युजर्सला 5G सेवेचा लाभ (Apple to launch iOS 16 5G Beta for iPhone users in India) घेता येणार आहे.
बीटा प्रोग्राम सुरू करणार : अॅपल कंपनी (Apple Company) पुढच्या आठवड्यात iOS बीटा प्रोग्राम सुरू करणार आहे. या प्रोग्राममुळे भारतीय यूजर्सला 5G सेवेचा (IOS 16 Beta Software Program) वापर करता येणार आहे. अॅपल कंपनी पुढील आठवड्यापासून म्हणजेच 7 नोव्हेंबर 2022 पासून iOS 16 बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम सुरू करणार आहे. या प्रोग्राममुळे आयफोन युजर्सला 5G सेवा वापरता येणार आहे. या बीटा चाचणीदरम्यान आयफोन यूजर्सला स्पीड टेस्ट करता येणार ( 7 November for indian iphone users ) आहे. तसचं, यूजर्सना फीडबॅक देण्याची सुविधा देखील मिळणार आहे. आयफोनमध्ये लवकरच 5G सेवेचा लाभ घेता येणार असल्यामुळे युजर्सला प्रचंड आनंद झाला आहे.
जिओ आणि एअरटेल यूजर्सला 5G सेवा : अॅपल कंपनी सध्या 5G सेवेसाठी देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांशी समन्वय साधून काम करत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नेटवर्क आणि क्वालिटी टेस्ट झाल्यानंतर 5G सेवेशी संबंधित एक स्टेबल अपडेट कंपनीकडून जारी केले जाईल. जेणेकरून यूजर्स ही सेवा वापरू शकतील. 'बीटा प्रोग्रामअंतर्गत, जिओ आणि एअरटेल यूजर्स पुढच्या आठवड्यापासून 5G सेवा वापरण्यास सक्षम असणार आहेत. त्याचबरोबर आगामी iOS अपडेटमध्ये यूजर्सना नवीन फीचर्स देखील मिळतील.
7 नोव्हेंबर पासून 5G सेवा : 1 ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा अधिकृतपणे सुरू झाली. 5G सेवेमुळे आता इंटरनेटचा स्पीड आणखी फास्ट होणार आहे. आयफोनसोबतच Android यूजर्सही 5G सेवा कधी सुरु होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अॅपल कंपनीने तर आता 5G सेवेबाबत अधिकृत घोषणा केली. अखेर आता आयफोन युजर्सला पुढच्या आठवड्यात या सेवेचा लाभ घेता येणार आहे. पण Android यूजर्सला 5G सेवा कधी वापरायला मिळणार याबाबत कंपन्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. दरम्यान, आयफोनच्या iPhone 14 सीरीज, iPhone 13 सीरीज, iPhone 12 सीरीज, iPhone SE (3rd Generation) या सर्व सीरिजमध्ये 5G सेवेचा लाभ घेता येणार आहे.