ETV Bharat / bharat

'तालिबानवर भारत विश्वास ठेवू शकत नाही, wait and watch ची भूमिका घ्यावी' - तज्ञ

अफगाणिस्तानातील भारतीय दुतावासात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणण्यासाठी भारत सरकारने विमान पाठवले असून अनेकांना भारतात आणलं आहे. तर भारताने अफगाणिस्तानील दुतवास खाली करू नये. भारतीय दुतवास कर्मचाऱ्यांना नुकसान पोहचवणार नाही, अशी ग्वाही तालिबानने दिली आहे. मात्र, सध्या जी परिस्थिती अफगाणिस्तानात निर्माण झाली आहे. अशात तालिबान्यावर विश्वास ठेवला जावू शकत नाही. त्यामुळे भारताने सावधगिरी बाळगावी, असे मत नवी दिल्लीतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे संशोधन संचालक प्रा. हर्ष पंत यांनी नोंदवले आहे.

taliban
तालिबान
author img

By

Published : Aug 21, 2021, 10:55 AM IST

नवी दिल्ली - अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवला असून तेथील परिस्थिती अत्यंत चिघळली आहे. अफगाणिस्तान सरकार आणि भारतामधील द्विपक्षीय संबंध दृढ होते. मात्र, तालिबान्याच्या हातात सत्ता गेल्याने भारतासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. अफगाणिस्तानातील भारतीय दुतावासात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणण्यासाठी भारत सरकारने विमान पाठवले असून अनेकांना भारतात आणलं आहे. तर भारताने अफगाणिस्तानील दुतवास खाली करू नये. भारतीय दुतवास कर्मचाऱ्यांना नुकसान पोहचवणार नाही, अशी ग्वाही तालिबानने दिली आहे. मात्र, सध्या जी परिस्थिती अफगाणिस्तानात निर्माण झाली आहे. अशात तालिबान्यावर विश्वास ठेवला जावू शकत नाही. त्यामुळे भारताने सावधगिरी बाळगावी, असे मत नवी दिल्लीतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे संशोधन संचालक प्रा. हर्ष पंत यांनी नोंदवले आहे.

दोहामधील तालिबान कार्यालयातून शेर मोहम्मद अब्बास स्तानिकजई यांनी भारताला दुतवास खाली न करण्याची विनंती केली होती. तरीही भारताने दुतवासातील 200 कर्मचाऱ्यांना मायदेशी आणलं आहे. अजूनही अनेक भारतीय काबूल आणि अफगाणिस्तानच्या इतर भागांमध्ये अडकलेले आहेत. सुमारे 300 शीख आणि हिंदूंच्या एका गटाने अफगाणिस्तानातील गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे.

भारताने wait and watch ची भूमिका घ्यावी -

तालिबानने केलेल्या कोणत्याही वचनबद्धतेवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. त्यामुळे भारताने सावध पावले उचलावीत. सध्या भारताने फक्त wait and watch ची भूमिका घ्यावी आणि परिस्थितीचे निरक्षण करावे, असे नवी दिल्लीतील ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे संशोधन संचालक प्रा. हर्ष पंत म्हणाले.

भारताचा निर्णय योग्यच -

तालिबानविरोधात नवा गट अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वात उभारत आहेत. या संपूर्ण आकार येण्यास आणखी वेळ लागेल. सध्या तर तालिबान घरोघरी जाऊन विरोधात असलेल्यांना ताब्यात घेणार असल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत तालिबानी याचप्रकारे वागत आले आहेत. त्यामुळे भारताने कर्मचाऱ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. तो योग्यच होता. कारण, त्यांची विनंती भारतीयांना तिथे असुरक्षित वातावरणात ठेवण्यास पुरेशी नाही, असे पंत म्हणाले.

तालिबानच्या भूमिका महत्त्वाची -

तालिबान राजवटीत भारत-अफगाण संबंध प्रोफेसर पंत म्हणाले, की तालिबानच्या काळात भारत-अफगाण संबंध वेगळे असणार आहेत. कारण, पुढील परिस्थितीबाबत अनिश्चितता आहे. राजकीय सलोख्यासाठी त्यांनी रणणिती आखली. तर भारताला त्यांच्याशी संवाद साधण्यात कोणतीही अडचण येऊ नये. मात्र, जर तालिबान अतिरेक्यांद्वारे चालवला जाणार एक क्रूर वैचारिक गटच राहिला. तर त्यांच्याशी जोडले जावे, यासाठी काहीच कारण नाही. काही फरक पडेल, असे त्यांच्याकडे काहीच नाही, जे ते भारताला देतील.

पाकिस्तानसोबतच्या सीमेवर बारिक नजर -

अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता भारताने सुरक्षेसंदर्भात काय दृष्ट्रीकोन ठेवावा, या प्रश्नाच्या उत्तरात पंत म्हणाले, की सध्याच्या परिस्थितीमध्ये चीन आणि पाकिस्तानला पुढे जाऊ द्यावे आणि स्थिती ओळखावी. अफगाणिस्तानातील समस्या कायम स्वरूपी संपाव्यात, यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले आहेत. मात्र, आता सध्या परिस्थिती वेगळी आहे. तालिबानसंदर्भात इतर देश कशी भूमिका यावर बरेच काही अवलंबून आहे. बहुधा, जग पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध परिस्थिती पाहिल. सध्या भारताने फक्त आपल्या पाकिस्तानसोबत असलेल्या सीमांवर बारिक लक्ष ठेवावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.