जयपूर : फेसबुकवर भेटलेल्या मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या भारतातील अलवरमधील अंजूने पाकिस्तानातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपण लवकरच भारतात परत येत असून आपल्या कुटुंबीयांना कोणताही त्रास देऊ नये, असे आवाहन अंजूने या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. पाकिस्तानातील सीमा हैदरने भारतात येत आपल्या प्रियकराची भेट घेतल्याने देशभर चर्चा सुरू आहेत. त्यातच आता भारताच्या अंजू या तरुणीने पाकिस्तान गाठल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
फेसबुकवरील मित्रासाठी अंजू पोहोचली लाहोरला : भिवडी येथील रहिवासी असलेली अंजू फेसबुकवरील मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानातील लाहोरला पोहोचली आहे. ही माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले. अंजूचा पती अरविंद याची भिवडी येथे चौकशी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील खानापूर गावात राहणारा अरविंद 2005 साली भिवडी येथे नोकरीसाठी आला होता. 2007 मध्ये त्याची मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अंजूशी भेट झाली. अंजूही भिवडीतील तापुकडा येथील एका कंपनीत काम करते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंजूने पाकिस्तानमधून व्हिडिओ बनवून तिच्या कुटुंबीयांना पाठवला. यामध्ये त्यांनी पोलीस प्रशासन आणि माध्यमांना आपल्या कुटुंबीयांना त्रास न देण्याबाबत आवाहन केले आहे.
कुटुंबीयांना त्रास देऊ नये : अंजूने शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्या मुलांना आणि कुटुंबीयांना त्रास देऊ नये, असे आवाहन केले आहे. ती अचानक पाकिस्तानात आलेली नसून यासाठी ती बऱ्याच दिवसांपासून नियोजन करत होती. ती कायदेशीररित्या पाकिस्तानात आल्याचे अंजूने यावेळी स्पष्ट केले आहे. ज्या मार्गाने आली त्याच कायदेशीर मार्गाने ती भारतात परतणार आहे. कोणाला बोलायचे असेल तर थेट माझ्याशी बोला, मी सगळ्या प्रश्नांचे उत्तर देईल, असेही अंजूने यावेळी स्पष्ट केले आहे. अंजू आणि तिचा पती अरविंदला 15 वर्षांची मुलगी आणि 5 वर्षांचा मुलगा आहे. अंजूने पाकिस्तानला जाण्यासाठी नवीन सिम घेतले होते. मात्र तिने तिचा नवीन नंबर पतीला दिला नाही. या माहितीनंतर स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून अरविंदशी चौकशी करत आहेत.
मी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असल्याचे अंजूने तिच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. मी दोन ते तीन दिवसात भारतात येईल. त्यामुळे पोलीस प्रशासन यंत्रणांसह सर्वांना उत्तर देण्यात येईल, असेही अंजूने यावेळी व्हिडिओत सांगितले आहे. पाकिस्तानमध्ये मी पूर्णपणे सुरक्षित आहे-अंजू
हेही वाचा -