जयपूर : आपल्या चार चिमुकल्यांना घेऊन स्वतःचा कथित प्रियकर सचिन मीनासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारत गाठणारी सीमा हैदर गेले काही दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यानंतर राजस्थानच्या अंजूने आपल्या फेसबुकवर भेटलेल्या कथित प्रियकरासाठी पाकिस्तान गाठल्याने नव्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. अंजूने फेसबुकवर भेटलेल्या कथित प्रियकरासाठी 21 जुलैला भारत-पाकिस्तान सीमारेषा ओलांडल्याचे तिने घेतलेल्या फोटोवरुन स्पष्ट झाले आहे. अंजू 20 ऑगस्टला भारतात परत येणार असल्याची माहिती तिच्या कथित प्रियकराने दिली आहे. दरम्यान अंजूसोबत आपण लग्न करणार नसल्याचे अंजूच्या कथित प्रियकर नसरुल्लाह याने स्पष्ट केले आहे.
कथित फेसबुक प्रियकराने फेटाळला लग्नाचा दावा : राजस्थानातील अलवर येथील अंजू आपल्या फेसबुकवर भेटलेल्या कथित प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेली आहे. मात्र अंजू 20 ऑगस्टला तिचा व्हिसा संपल्यावर भारतात परतणार असल्याची माहिती तिचा कथित प्रियकर नसरुल्ला याने दिली आहे. त्यांच्या दोघातील प्रेमसंबंध नसरुल्लाने फेटाळून लावले आहे. अंजूसोबत लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचेही नसरुल्लाहने यावेळी स्पष्ट केले. नसरुल्लाह आणि अंजूची फेसबुकवर 2009 मध्ये मैत्री झाली होती.
अंजू पोहोचली पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा भागात : राजस्थानमधील खरगपुरा गावातील शिवनाथ कुटुंबासह भिवडी येथे राहतात. ते तिथे खासगी काम करतात. त्यांना अरविंद कुमार (40), अनूप (35) आणि अभिषेक (30) अशी तीन मुले आहेत. पैकी थोरल्या अरविंद कुमार याचे 2007 मध्ये मध्य प्रदेशातील गुना येथील रहिवासी असलेल्या अंजूशी लग्न झाले होते. अरविंद डेटा एन्ट्रीचे काम करताे. अंजूही तापुकरा येथील एका कंपनीत काम करते. अंजू आणि अरविंद यांना दोन मुले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजूची पाकिस्तानच्या नसरुल्लासोबत मैत्री झाली. यानंतर अंजू त्याच्या प्रेमात पडल्याने ती पती आणि दोन मुलांना सोडून कथित प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे पोहोचली.
अंजूने जुन्या पत्त्यावर बनवला पासपोर्ट : अंजूने तिच्या पतीला ती जयपूरला जात असल्याचे सांगून निघून गेली आहे. ती पाकिस्तानात पोहोचल्याचे मला आता समजल्याची माहिती तिचा पती अरविंदने दिली. मी तिला पाकिस्तानमध्ये नसरुल्लाह नावाच्या व्यक्तीला भेटायला गेली होती का, असे विचारले. मात्र तिने मला या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. अंजूने आधीच जुन्या पत्त्यावरून पासपोर्ट बनवला होता. याआधी ती कधीही घराबाहेर पडली नव्हती. एकदा फरिदाबादला तिच्या नातेवाईकाला भेटायला गेली होती. मात्र ती पाकिस्तानात पोहोचल्याची बाब धक्कादायक आहे. ती लवकरच येईल, अशी आशा आहे. ती तीन-चार दिवसात भारतात येणार असल्याचे अंजूने सांगितल्याची माहिती अरविंदने दिली आहे.
अंजू एकदाच आली होती सासरला : अरविंदचे कुटुंब भिवडीला जाऊन जवळपास 12 वर्षे झाली आहेत. अरविंदची पत्नी अंजू फक्त एकदाच सासरला आली आहे. त्या वेळी ती आपल्या दिराच्या लग्नासाठी आली होती. मात्र तेव्हा अंजूला मूल झाले नव्हते, अशी माहिती अरविंदच्या काकू सुभती यांनी दिली. अंजू पाकिस्तानात गेल्याची माहिती माध्यमांद्वारे मिळाल्यानंतर कुटुंबीय चिंतेत आहे. अंजू तीन दिवसांपूर्वी लाहोरला पोहोचली. रविवारी अंजूने मुलांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. ती तिच्या मित्राला भेटण्यासाठी लाहोरला पोहोचल्याचे तिने यावेळी सांगितल्याची माहितीही तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
हेही वाचा -