ETV Bharat / bharat

Angarki Sankashti Chaturthi 2023 : नवीन वर्षातील प्रथम अंगारकी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि महत्व

जर संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर, तिला 'अंगारकी संकष्टी चतुर्थी' (Angarki Sankashti Chaturthi 2023) म्हणतात आणि ती अत्यंत शुभ मानली जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो. नवीन वर्षात 10 जानेवारी 2023 ला (10 January 2023) रोजी प्रथम अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे, त्यामुळे या चतुर्थीचे विशेष महत्व असणार आहे. जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ (Know Moonrise time) आणि महत्व काय आहे.

Angarki Sankashti Chaturthi 2023
नवीन वर्षातील प्रथम अंगारकी संकष्टी चतुर्थी
author img

By

Published : Jan 3, 2023, 1:55 PM IST

Updated : Jan 10, 2023, 6:40 AM IST

पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक (मंगळ देव) यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की, जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल ती 'अंगारकी संकष्टी चतुर्थी' म्हणून (Angarki Sankashti Chaturthi 2023) ओळखली जाईल. हिन्दू पंचागानुसार दर महिन्यात दोनदा चतुर्थी येते – विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चवथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते. तर कृष्ण पक्षाच्या चवथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते. म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेश पूजनाचे खूप महत्त्व आहे. यंदा नवीन वर्षातील 10 जानेवारी 2023 ला (10 January 2023) येणारी हि प्रथम अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे.

तारिख आणि चंद्रोदयाची वेळ : (Chaturthi Dates And Moonrise time) यंदा 2023 मध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी 10 जानेवारी रोजी (10 January 2023) आहे. चंद्रोदयाची वेळ 9 वाजून 11 मिनिटे आहे. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे. यानंतर घरातील मंदिरातील गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधाने स्वच्छ करावी. सिंदूर, दुर्वा, फुले, तांदूळ, फळे, जनेयू, प्रसाद इत्यादी वस्तू पूजेसाठी गोळा कराव्या. धूप- दीप लावावे. 'ॐ गं गणपते नमः ' या मंत्राचा जप करून पूजा करावी. मंत्राचा 108 वेळा जप करावा. श्रीगणेशासमोर व्रत करून दिवसभर अन्न न खाण्याचे संकल्प घ्यावे. उपवासात फळे, पाणी, दूध, फळांचा रस इत्यादींचे सेवन करता येते.

अंगारकी संकष्टी चतुर्थी चे महत्व : (Angarika Sankashti Chaturthi Importance) 'गणेश पुराण' आणि 'स्मृती कौस्तुभ' या धार्मिक ग्रंथांमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि विधी सांगितले आहेत. आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी आणि गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणेशभक्तांमध्ये या दिवसाचे खूप महत्त्व आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात. अशा प्रकारे श्रीगणेशाची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि समस्या दूर होण्यास मदत होईल. अंगारकी चतुर्थी सहा महिन्यांतून एकदा येते आणि मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते. या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्टी चतुर्थीचे लाभ मिळतात, असे मानले जाते.

फलश्रुति (Benefits) : संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात, लग्ने जमतात, संतानप्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरुप राहते. भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, किर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते. 21 संकष्टी चतुर्थी व एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते.

Last Updated : Jan 10, 2023, 6:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.