पानिपत Anantnag Encounter : अनंतनाग इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलातील तीन अधिकाऱ्यांना वीरमरण आलं आहे. या हल्ल्यात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौंचक आणि पोलीस उपाधीक्षक हिमायून भट्ट हे हुतात्मा झाले आहेत. यातील मेजर आशिष धौंचक ( Anantnag Encounter ) यांनी सैन्य दलात सहभागी झाल्यानंतर पहिलं कर्तव्य ज्या ठिकाणी बजावलं, त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आशिष धौंचक यांच्या वीरमरणाची माहिती पानिपतच्या बिंझौल गावात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना रात्री उशिरा ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आशिष धौंचक यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
पहिलं कर्तव्य बजावलं, त्याच ठिकाणी घेतला अखेरचा श्वास : पानिपतमधील बिंझौल या गावातील आशिष धौंचक यांना बालपणापासून सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे आशिष धौंचक हे 2012 मध्ये सैन्यात लेफ्टनंट म्हणून भरती झाले होते. आशिष धौंचक यांची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये झाली होती. त्यानंतर आशिष धौंचक यांनी मेरठ, बारामुल्ला, भटिंडा आदी ठिकाणी आपली सेवा बजावली आहे. आशिष धौंचक यांना 2018 मध्ये मेजर म्हणून बढती मिळाल्यानंतर त्यांची पोस्टिंग पुन्हा राजौरीमध्ये करण्यात आली होती. मात्र बुधवारी राजौरीमध्ये सुरू असलेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत त्यांना वीरमरण आलं आहे.
सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न : आशिष धौंचक यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1987 रोजी पानिपतमधील बिंझौल या गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव लालचंद धौंचक तर आईचं नाव कमला देवी असं होतं. आशिष धौंचक यांना लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सैन्यात जाण्याची तयारी केली होती. आशिष धौंचक यांना खेळातही चांगलाच रस होता. त्यांनी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक मिलवलं होतं. त्यासह आशिष धौंचक सेंट्रल विद्यापीठाचा अतिशय गुणी विद्यार्थी होता असं, त्यांच्या काकानं सांगितलं. आशिष धौंचक यांचे वडील लालचंद धौंचक हे एनएफएलमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांनी गाव सोडून एनएफएल टाऊनशिपमध्ये राहणं पसंत केलं होतं. 1998 ते 2020 पर्यंत आशिष धौंचक यांचं कुटुंब या टाऊनशिपमध्ये राहत होतं.
हेही वाचा :