ETV Bharat / bharat

Anantnag Encounter : दहशतवाद्यांशी लढताना सैन्याच्या कर्नल, मेजरसह तीन अधिकाऱ्यांना वीरमरण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 8:30 PM IST

Updated : Sep 13, 2023, 10:58 PM IST

काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यातील कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धौनचक आणि डीएसपी हुमायून भट यांना वीरमरण आलं. मंगळवार झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होतं.

Anantnag Encounter
Anantnag Encounter

पहा व्हिडिओ

अनंतनाग Anantnag Encounter : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात बुधवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सैन्याच्या कर्नलसह सुरक्षा दलाचे तीन अधिकारी शहीद झाले. गडोले परिसरात मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरू करण्यात आली होती, मात्र रात्री कारवाई थांबविण्यात आली होती.

  • J&K | An Indian Army Colonel commanding a Rashtriya Rifles Unit along with a Major have lost their lives in an encounter in Anantnag with terrorists in Kashmir. The officer was commanding 19 RR: Indian Army officials pic.twitter.com/DDTjv89huT

    — ANI (@ANI) September 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला : काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडर असलेले भारतीय सैन्याचे कर्नल आणि मेजर यांना आपला जीव गमवावा लागला. १९ आरआर सीओ कर्नल मनप्रीत सिंग यांना या चकमकीत वीरमरण आलं. त्यांनी समोरून आपल्या टीमचं नेतृत्व करत दहशतवाद्यांवर हल्ला केला. मात्र, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. मेजर आशिष धौनचक आणि डीएसपी हुमायून भट यांना देखील गोळ्या लागल्यानं ते जखमी झाले. या तिघांचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला.

मनप्रीत सिंग सेना पदकानं सन्मानित : शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांचं कुटुंब पंचकुलाच्या सेक्टर २६ मध्ये राहत असल्याची माहिती आहे. त्यांना सेना पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. या चकमकीत पानिपतचे रहिवासी मेजर आशिष धौनचक हे शहीद झाले. हरियाणाच्या बिंझौल गावातील रहिवासी असलेल्या आशिष याचं कुटुंब पानिपत शहरात भाड्याच्या घरात राहतं. तिथे त्यांची पत्नी त्यांच्या आई-वडिलांसोबत राहते. आशिष हे तीन बहिणींचे एकुलता एक भाऊ आहेत.

सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक : 'पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. सैन्याची संयुक्त टीम संशयित जागेजवळ पोहोचताच, अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ज्याला सैन्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यानंतर चकमक सुरू झाली', असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

कालही झाली होती चकमक : काल (मंगळवार, १२ सप्टेंबर) राजौरीमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. नारला गावात मंगळवारी दहशतवादी आणि सैन्याच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. यामध्ये सैन्याचा एक जवानही ठार झाला. यासह दोन जवान आणि एक विशेष पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत.

सैन्याच्या श्वानानं सर्वोच्च बलिदान दिलं : मंगळवारी दहशतवाद्यांशी लढताना सैन्याच्या एका शूर श्वानानं आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. सैन्यातील लॅब्राडोर जातीच्या 'केंट' या मादी श्वानानं आपल्या हॅंडलरचा जीव वाचवला. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबारात तिचा मृत्यू झाला. केंट ही सैन्याच्या 'ऑपरेशन सुजलीगाला'मध्ये सर्वात आघाडीवर होती.

हेही वाचा :

  1. Army Dog Kent : दहशतवाद्यांशी चकमकी दरम्यान सैन्याच्या श्वानाचं सर्वोच्च बलिदान
  2. Khalistani Attacked On Embassy : भारतीय दूतावासांवर हल्लेखोर खलिस्तानींची ओळख पटली, NIA ची टीम तपासासाठी जाणार कॅनडाला

Last Updated : Sep 13, 2023, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.