ETV Bharat / bharat

Anant Ambani Varanasi : अनंत अंबानींनी सपत्नीक घेतले काशी विश्वनाथचे दर्शन

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्यांच्या साखरपुड्यानंंतर देशातील सर्व मोठ्या मंदिरांना भेटी देत आहेत. मंगळवारी अनंत अंबानी वाराणसीमधील बाबा विश्वनाथ धाममध्ये पोहोचले. तेथे त्यांनी विशेष पूजा केली. अनंत अंबानी यांच्या या भेटीची माहिती मंदिर प्रशासनालाही नव्हती.

Anant Ambani Varanasi
अनंत अंबानी
author img

By

Published : Feb 1, 2023, 6:49 AM IST

Updated : Feb 1, 2023, 7:06 AM IST

अनंत अंबानींनी सपत्नीक घेतले काशी विश्वनाथचे दर्शन

वाराणसी : उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी सध्या खूप चर्चेत आहे. अनंत अंबानी यांचा नुकताच उद्योगपती वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतरचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. या सर्व चर्चेदरम्यान अनंत अंबानी मंगळवारी उत्तर प्रदेशातील पवित्र नगरी वाराणसीत विश्वनाथच्या दर्शनासाठी पोहोचले.

Anant Ambani Varanasi
बाबा विश्वनाथ यांचा जलाभिषेक आणि दूध अभिषेक केला

प्रशासनाला भेटीची माहिती नव्हती : अनंत अंबानी वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात अचानकपणे आले. त्यांच्या या भेटीची माहिती मंदिर प्रशासनालाही नव्हती, असे विश्वनाथ मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. अनंत अंबानी यांनी विश्वनाथ मंदिरात सुमारे 20 मिनिटे विशेष पूजा केली. त्यानंतर त्यांनी बाबा विश्वनाथ यांचा जलाभिषेक आणि दूध अभिषेक केला. रात्री 8.45 च्या सुमारास अनंत अंबानींच्या वाहनांचा ताफा श्री काशी विश्वनाथ धामच्या छटा गेटवर पोहोचला. येथून अनंत यांचे वाहन विश्वनाथ धाम संकुलात पोहोचले. तर उर्वरित वाहने बाहेरच थांबवण्यात आली.

मंदिरात विशेष पूजा केली : मंदिराचे जनसंपर्क अधिकारी पीयूष तिवारी यांनी सांगितले की, त्यांनी मंदिरात विशेष पूजा केली. या संदर्भात मंदिर प्रशासनाला यापूर्वी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष तयारी करण्यात आली नव्हती. रात्री होणार्‍या शयन आरतीपूर्वी त्यांनी मंदिरात विशेष पूजा केली. दोन पुजाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी बाबा विश्वनाथांच्या गर्भगृहात विधिवत पूजा केली. पुजाऱ्यांनी त्यांना रुद्राक्षाचे मणी, बाबांचे अंगवस्त्र आणि चंदनाचा प्रसाद अर्पण केला. त्यांना बाबा विश्वनाथ यांचे चित्र आणि पाच फळांचे लाडूही प्रसाद म्हणून देण्यात आले आहेत. अनंत अंबानी यांनी मागच्या आठवड्यात भगवान जगन्नाथ पुरींचे दर्शन घेतले होते. तेथे त्यांनी भगवान जगन्नाथाची पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

अनंत अंबानींचा नुकताच साखरपुडा झाला : अनंत अंबानी यांचा 19 जानेवारी 2023 रोजी उद्योगपती वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला होता. अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंटमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लोक तसेच अनेक क्रिकेटर्स पोहोचले होते. मुकेश अंबानी यांच्या 'अँटीला' या गगनचुंबी इमारतीमध्ये अनंत आणि राधिकाची एंगेजमेंट झाली होती. त्याचवेळी अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंटचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एक व्हिज्युअल खूपच खास होते. या व्हिज्युअलमध्ये अनंत आणि राधिकाची एंगेजमेंट रिंग त्यांच्या पाळीव कुत्र्याने आणली होती. या खास प्रसंगी अंबानी कुटुंबाने अनंत आणि राधिकाला सरप्राईज म्हणून एक डान्स परफॉर्मन्सही केला होता.

हेही वाचा : Anant Ambani Visits Jagannath : साखरपुड्यानंतर अनंत अंबानींने घेतले भगवान जगन्नाथाचे दर्शन, म्हणाले..

Last Updated : Feb 1, 2023, 7:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.