ETV Bharat / bharat

हा धडा आहे, तुम्ही श्रीमंत असताना पैसे कसे खर्च करू नये, आनंद महिंद्रांच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा - आनंद महिंद्रा ट्विटर

सोन्याचा मुलामा असलेल्या एका फेरारी कारचा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर ही कार अमेरिकेतील एका भारतवंशीयाची असल्याचे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रांनी यावर नाराजी व्यक्त करणारे कॅप्शन दिले आहे.

हा धडा आहे, तुम्ही श्रीमंत असताना पैसे कसे खर्च करू नये, आनंद महिंद्रांच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा

author img

By

Published : Jul 21, 2021, 5:27 PM IST

नवी दिल्ली : सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असणारे उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या एका नव्या ट्विटची आता चांगलीच चर्चा होत आहे. या ट्विटमधून महिंद्रा यांनी श्रीमंतीच्या प्रदर्शनावर टीका केली आहे. श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी पैसे खर्च करणे योग्य नाही असे परखड मत आनंद महिंद्रा यांनी या ट्विटमधून व्यक्त केले आहे.

  • I don’t know why this is going around on social media unless it is a lesson on how NOT to spend your money when you are wealthy… pic.twitter.com/0cpDRSZpnI

    — anand mahindra (@anandmahindra) July 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पैसे असे खर्च करू नये

सोन्याचा मुलामा असलेल्या एका फेरारी कारचा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर ही कार अमेरिकेतील एका भारतवंशीयाची असल्याचे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रांनी यावर नाराजी व्यक्त करणारे कॅप्शन दिले आहे. "मला माहिती नाही हे सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे. खरं म्हणजे हा एक धडा आहे, की तुम्ही श्रीमंत असताना तुमचे पैसे कसे खर्च नाही केले पाहिजे" असे कॅप्शन महिंद्रांनी याला दिले आहे.

सोशल मीडियावर सक्रीय

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. दररोज घडणाऱ्या घडामोडींवर तसेच समाजातील वेगवेगळ्या व्हायरल बाबींवरही ते सोशल मीडियातून व्यक्त होत असतात. सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या काही प्रतिभावंतांचे कौतुकही आनंद महिंद्रांनी केले आहे.

हेही वाचा - उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्याकडून मुंबईतील पहिल्या ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.