बंगळुरू - शहरातील पॅलेस मैदानावर उद्यापासून तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2023 आयोजित केला जाणार आहे. तृणधान्याला बाजारपेठ मिळून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळ्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
पैलेस मैदानावर भरणार व्यापार मेळा : कृषी विभाग, केएपीपीईसी आणि आयसीसीओएच्या सहकार्याने 20 ते 22 जानेवारी असे तीन दिवस पैलेस मैदानावरील त्रिपुरवासिनी परिसरात हा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आयोजित केला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद जोशी, कृषी मंत्री बी.सी. पाटील, उच्च शिक्षण मंत्री डॉ. अस्वत्थ नारायण, भगवंत खुबा, शोभा करंदलाजे, कैलास चौधरी, राजीव चंद्रशेखर आदींची उपस्थिती राहणार आहे.
सेंद्रिय आणि तृणधान्य उत्पादनांसाठी चांगली बाजारपेठ : 2017, 2018 आणि 2019 मध्ये सेंद्रिय आणि तृणधान्य उत्पादनांसाठी चांगली बाजारपेठ प्रदान करण्यासाठी या मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात शेतकरी, खरेदीदार, विक्रेते, निर्यातदार यांना भरपूर संधी प्रदान करण्यात येते. सेंद्रिय आणि तृणधान्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा मोठ्या संख्येने सगळ्यांनाच आकर्षित करण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आयोजित करण्यात आला आहे.
तीन दिवसीय चालणार व्यापार मेळा : या मेळ्यात सुमारे 300 स्टॉल्स बुक करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय अन्नधान्य कंपन्याही या मेळ्यात सहभागी होणार असून केरळ, महाराष्ट्र, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, मणिपूर, छत्तीसगड, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार आदी राज्यांतील कंपनीचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन : या व्यापार मेळ्यात आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. या परिषदेत आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी होणार आहेत. कन्नडमध्ये शेतकरी कार्यशाळा आयोजित केली जाईल. जिथे कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ आणि सेंद्रिय, तृणधान्य आणि नैसर्गिक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकऱ्यांना नवीन विकास आणि तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. परिषदेत तृणधान्य आणि सेंद्रिय खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येमार आहेत. या मेळ्यात एकूण 15 खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे.
व्यापार, करार आणि निर्यात : या व्यापार मेळ्यात नवीन बाजारपेठेच्या संधी सुलभ करण्यासाठी संपूर्ण भारतासह इतर देशांमधील विक्रेते आणि शेतकऱ्यांना थेट जोडण्याचा हेतू आहे. या व्यापार मेळ्यात 200 हून अधिक उत्पादक आणि विक्रेत्यांनी नोंदणी केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.