नवी दिल्ली - म्यानमारजवळ असलेल्या मोनव्याला रात्री 11 वाजून 58 मिनिटाला भूकंपाचे धक्के बसले आहेत. हा भूकंपाचा धक्का 5.5 रिश्टर क्षमतेचा असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजीने म्हटले आहे.
मध्यरात्री लेह, लडाखला भूकंपाचे धक्के बसले आहेत. हा भूकंपाचा धक्का साडेबारा वाजता बसला आहे. भूकंपाची 3.8 रिश्टर इतकी नोंद झाल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजीने म्हटले आहे.