ETV Bharat / bharat

केंद्रीय नेतृत्वाकडून गडकरींचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न, संसदीय मंडळातून वगळलं - Reconstitution of BJP parliamentary board

भारतीय जनता पक्षामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. आज बुधवारी भाजपने केंद्रीय संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. BJP Parliamentary Board केंद्रीय संसदीय मंडळामध्ये भाजपने 11, तर केंद्रीय निवडणूक समितीमध्ये 15 जणांना स्थान दिले आहे. विशेष म्हणजे संसदीय समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना डच्चू देण्यात आला आहे.

केंद्रीय नेतृत्वाकडून गडकरींचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न, संसदीय मंडळातून वगळलं

author img

By

Published : Aug 17, 2022, 7:55 PM IST

मुंबई - भाजपच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारी केंद्रीय संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केला. केंद्रीय संसदीय मंडळामध्ये तीन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. Gadkari Was Dropped From The Parliamentary Board यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, के. लक्ष्मण आणि सर्बानंद सोनोवाल यांचा समावेश आहे. यासह या समितीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि बीएल संतोष यांचा समावेश आहे. बीएल संतोष यांना केंद्रीय संसदीय मंडळाचे सचिवपद देण्यात आले आहे.

नवीन संसदीय मंडळ
नवीन संसदीय मंडळ

गडकरी बाहेर असताना फडणवीसांना एंट्री भाजपने केलेल्या या बदलातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे नितीन गडकरी यांची संसदीय मंडळातून हकालपट्टी केली आहे. मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात ते अतिशय लोकप्रिय मंत्री राहिले आहेत. Reconstitution of BJP's parliamentary board रस्ते आणि वाहतूक मंत्रालयातील त्यांच्या कामाची बरीच चर्चा झाली आहे. शिवाय, पक्षाच्या माजी अध्यक्षांना संसदीय मंडळात कायम ठेवण्याची परंपरा आहे, जी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या हकालपट्टीनंतरच संपली. मात्र नितीन गडकरींसारख्या सक्रिय आणि तगड्या नेत्याला येथून हटवणे धक्कादायक आहे. मात्र, समतोल साधत भाजपने नितीन गडकरींच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची बढती करून त्यांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश केला आहे.

काय म्हणाले होते गडकरी दोन आठवड्यापूर्वी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटले होते की, मला खूप वेळा राजकारण सोडावसे असे वाटते. आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. तसेच, राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे असही ते म्हणाले होते. दरम्यान,नितीन गडकरी हे अनेक दिवसांपासून भाजपमध्ये बाजूला असल्याचे दाखवत आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका असो किंवा यंदाच्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका. प्रचारात किंवा अन्य कोणत्याही भूमिकेत ते कुठेच दिसले नाहीत.

एका शीख नेत्याचा संसदीय मंडळात समावेश याशिवाय शिवराज सिंह चौहान यांचीही दीर्घकाळानंतर संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पक्षाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीवर सत्यनारायण जातिया यांचा समावेश केला आहे. नव्याने स्थापन झालेल्या निवडणूक समिती आणि भाजपच्या संसदीय मंडळातही राज्य आणि जाती यांच्यातील समतोल पाहायला मिळतो. भाजपने पहिल्यांदाच इक्बाल सिंग लालपुरा यांच्या रूपाने एका शीख नेत्याचा संसदीय मंडळात समावेश केला आहे. याशिवाय ओबीसी नेता म्हणून हरियाणाच्या सुधा यादव यांना संधी देण्यात आली आहे. तर तेलंगणाचे के. लक्ष्मण आणि कर्नाटकचे बीएस येडियुरप्पा यांनाही दक्षिण विस्ताराच्या योजनेचे संकेत देण्यात आले आहेत.

निवडणूक समितीत फडणवीस यांची वर्णी दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचीही पुर्रचना करण्यात आली आहे. यात 15 नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्र भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची यात वर्णी लागली आहे. यासह जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, बीएल संतोष आणि वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे.

विधानसभेचा नेता निवडण्याचे कामही हे मंडळ करते भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाला सर्वात ताकदवान मानले जाते. कारण राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर आघाडीचा निर्णय घ्यायचा झाल्यास केंद्रीय संसदीय मंडळाचा निर्णय अंतिम असतो. तसेच, राज्यांमध्ये विधानपरिषद किंवा विधानसभेचा नेता निवडण्याचे कामही हे मंडळ करते. केंद्रीय निवडणूक समिती ही भाजपचे दुसरी ताकदवान संस्था आहे. निवडणूक समितीचे सदस्य लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या तिकीटांचा निर्णय घेतात. यासह कोण निवडणूक लढवणार आणि कोण राजकारणाबाहेर राहून पक्षासाठी काम करणार हे देखील ही समिती निश्चित करते.

नितीन गडकरींकडून प्रतिक्रिया नाही शिवराजसिंह चौहान यांची एक्झिट समजण्यासारखी असली तरी नितीन गडकरींची एक्झिट धक्कादायक आहे. कारण, माजी राष्ट्रीय अध्यक्षांना संसदीय मंडळात सहभागी करून घेण्याची परंपरा आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना संसदीय मंडळातून वगळल्यानंतरच ही परंपरा खंडित झाली. परंतु, नितीन गडकरी हे सध्याच्या राजकारणातील सक्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांची हकालपट्टी धक्कादायक आहे. याबाबत नितीन गडकरींकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा - Deputy CM Devendra Fadnavis मुंबई महापालिकेवर सत्तास्थापन करेपर्यंत उत्साह कमी होऊ देऊ नका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.