नवी दिल्ली : अमूलने आपल्या दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. अमूलच्या सर्व प्रकारच्या पाऊच दुधाच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ झाली आहे. या नवीन किमती तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत. या दरवाढी नंतर अमूल गोल्ड मिल्क 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेश मिल्क 54 रुपये प्रति लीटर, अमूल गायीचे दूध 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल ए2 म्हशीचे दूध 70 रुपये प्रति लीटर असेल.
गेल्या वर्षी २ रुपयांनी वाढ : अमूलने गेल्या ऑक्टोबरमध्येच दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकट्या पशुखाद्याचा खर्च सुमारे २० टक्क्यांनी वाढला आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन आमच्या सभासद संघटनांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या किमतीत ८ ते ९ टक्क्यांनी वाढ केली आहे, असे अमुलने म्हटले होते. डिसेंबरमध्ये मदर डेअरीने दिल्ली-एनसीआर मध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली होती.
हेही वाचा : Khelo India Youth Games : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा, पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले!