कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह हे बॅनर्जी हे टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि इतर पक्ष कार्यकर्त्यांवरील हल्ल्यामागे असल्याचा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी आरोप केला आहे.
भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरामध्ये अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूल पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर विविध घटनांमध्ये हल्ले झाले आहेत. तृणमूल पक्षाने 2023 च्या विधानसभा निवडणुकीकरता त्रिपुरामध्ये विस्तार करण्याचे नियोजन केले आहे.
हेही वाचा-पोक्सो कायद्यांतर्गत राहुल गांधींवर गुन्हा दाखल करा, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
ममता बॅनर्जी यांनी जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांची एसएसकेएम रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की भाजप हे त्रिपुरा, आसाम, उत्तर प्रदेश आणि जिथेही सत्ता असेल तिथे अराजकता असलेली सत्ता चालविते. आम्ही अभिषेक आणि आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय असे हल्ले शक्य नाहीत. त्रिपुरा पोलिसांसमोर हल्ले झाले. हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे धाडस त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही.
हेही वाचा-पंजाबमध्ये टिफिन बॉक्समध्ये आढळा बॉम्ब, हाय अलर्ट जारी