श्रीनगर : खराब हवामानामुळे बालटाल आणि पहलगाम या दोन्ही ठिकाणांहून अमरनाथ यात्रा सध्या थांबवण्यात आली ( Amarnath Yatra temporarily stopped ) आहे. मात्र, यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. त्याचबरोबर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवास थांबवण्यात येणार ( Amarnath Yatra banned from Pahalgam and Baltal ) आहे.
३० जूनपासून दोन मार्गांनी यात्रा : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पवित्र अमरनाथ गुंफा परिसरात ढगफुटीच्या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाल्यानंतर यात्रा स्थगित करण्यात आली होती. ढगफुटीनंतर अनेक तंबू आणि सामुदायिक किचन चिखल आणि ढिगाऱ्याच्या कचाट्यात सापडले होते. अमरनाथ यात्रा दोन दिवसांनी सुरू झाली. यावर्षी अमरनाथ यात्रा ४३ दिवस चालणार असून, ३० जूनपासून दोन मार्गांनी ही यात्रा सुरू झाली आहे.
११ ऑगस्टपर्यंत चालणार यात्रा : यापैकी एक मार्ग 48 किमी लांबीचा आहे, जो दक्षिण काश्मीरच्या पहलगाममधील नूनवानमधून जातो. त्याच वेळी, दुसरा मार्ग तुलनेने लहान आणि 14 किमी आहे, जो एक तीव्र चढण आहे आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालटालमधून जातो. अमरनाथ यात्रा 11 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा : Video : अमरनाथच्या ढगफुटीनंतरचे अंगावर काटा आणणारे व्हिडीओ.. पहा ढगफुटीनंतरची भीषण परिस्थिती