ETV Bharat / bharat

ठरलं! काँग्रेसला अमरिंदर सिंग दाखविणार 'हात'; कमळाचा करणार नाही स्वीकार

author img

By

Published : Sep 30, 2021, 3:47 PM IST

पंजाबमधील काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू व काँग्रेसकडून मिळालेल्या वागणुकीवरही टीका केली आहे.

Amarinder Singh
Amarinder Singh

नवी दिल्ली - पंजाबमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अखेर राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसमध्ये राहणार नाही. मात्र, भाजपमध्येही जाणार नसल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत अमरिंदर सिंग यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की मी आता काँग्रेसपासून दूर आहे. काँग्रेसमध्ये राहणार नाही. अशा पद्धतीने मला वागविता येणार नाही.

हेही वाचा-नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची 'ही' आहेत 5 कारणे

माझी विश्वासर्हता पणाला लागली होती-

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. कॅप्टन म्हणाले, की गेली 52 वर्षे मी राजकारणात आहे. सकाळी साडेदहा वाजता काँग्रेस अध्यक्षांनी मला राजीनामा देण्यास सांगितले आहे. मी कोणताही प्रश्न विचारला नाही. सायंकाळी 4 वाजता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला आहे. जर तुम्हाला 50 वर्षानंतरही संशय वाटत असेल आणि माझी विश्वासर्हता पणाला लागली असेल तर, पक्षात राहण्याचा काय अर्थ आहे?

हेही वाचा-काँग्रेसमध्ये कोणीही अध्यक्ष नाही, कुणीतरी निर्णय घेते- सिब्बल यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

अशा ठिकाणी कोण राहू शकते?

अमरिंदर सिंग यांच्या माहितीनुसार त्यांना खूप अपमानित वाटले. मी माझी भूमिका काँग्रेसकडे स्पष्ट केली. अशा पद्धतीने मला वागविले जाऊ शकत नाही. मी काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही. मात्र विश्वासाची कमरतरता असेल अशा ठिकाणी कोण राहू शकते? भाजपमध्ये जाणार नसल्याचेही अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-अमरिंदर सिंग-अमित शाह यांची दिल्लीत भेट; कॅप्टन म्हणाले, शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा!

सिद्धू हे टीम प्लेयर नाहीत-

अमरिंदर सिंग यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. त्याबाबत अमरिंदर सिंग म्हणाले, की सिद्धू हे प्रगल्भ नाहीत. ते स्थिर व्यक्ती नसल्याचे मी अनेकदा सांगितले आहे. ते टीममधील खेळाडू नाहीत. ते एकटे आहेत. ते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कशी सांभाळणार? त्यासाठी तुम्हाला टीम प्लेयर असायला हवे. सिद्धू तसे नाहीत.

काँग्रेसला नाकारण्याचे 20 टक्क्यांनी वाढले प्रमाण

पुढील वर्षाच्या सुरुवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्याबाबत माजी मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसने जुलै ते सप्टेंबरमध्ये सर्वेक्षण केले होते. त्यानुसार आम आदमी पक्षाचे प्रमाण वाढत आहे. तर काँग्रेसचे प्रमाण कमी होत आहे. काँग्रेसला नाकारण्याचे 20 टक्क्यांनी प्रमाण वाढल्याचे सर्वेक्षणात आढळले होते. ही निवडणूक खूप वेगळी असणार आहे. काँग्रेस, आप, अकाली दल, अकाली दलाचे गट आणि यापेक्षा वेगळी आघाडी वाढणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.