Punjab Assembly Election 2022 : आम्ही भाऊ बहिण एकमेकांसाठी जीव देऊ शकतो - प्रियांका गांधी - Punjab Assembly Election 2022
दिल्लीतून आलेला एक पक्ष दिल्ली मॉडेल दाखवून पंजाबमधील मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात दिल्ली मॉडेलबाबत जाहिराती केल्या जात आहेत. पण, अशा जाहिरातींना बळी पडू नका. कारण, 2014 केंद्रात आलेल्या भाजपनेही देशासमोर गुजरात मॉडेल ठेवले होते. मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात आल्या. मात्र, झाले काय, असे म्हणत आपसह भाजपवरही काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्या प्रियांका गांधी वाड्रा ( Senior Congress leader Priyanka Gandhi Vadra ) यांनी टीका केली. पंजाब राज्यात 20 फब्रुवारीला ( Punjab Assembly Election 2022 ) मतदान होणार असून 10 मार्चला मत मोजणी होणार आहे.

कोटकपूरा (पंजाब) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असल्याची टीका केली होती. यावर प्रियांका गांधी ( Senior Congress leader Priyanka Gandhi Vadra ) यांनी उत्तर देत म्हणाल्या, आम्ही दोघे भाऊ बहिण एकमेकांसाठी जीव देऊ शकतो. त्या पंजाब येथील आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत ( Punjab Assembly Election 2022 ) बोलत होत्या.
पूर्वीची सरकार काँग्रेसकडून नाही तर भाजपकडून चालवली जात होती - पंजाबमध्ये मागील पाच वर्षे आमची सत्ता होती. आमच्या सरकारमध्ये काही त्रुट्याही होत्या. ती सरकार पंजाबमधून नाही तर दिल्लीतून चालवली जात होती. मात्र, ती काँग्रेसमार्फत नाही तर भाजपाकडून ती सरकार चालवली जात ( Amarinder Singh Govt. Was Being Run by BJP ) होती, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी पूर्व मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ही अदृश्य युती समोर आल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री बदलावे लागले. सिंह यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांच्यासह झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस ( PLC ) पक्षाची स्थापना केली.
गुजरात मॉडेल दाखवून देशाचे काय केले - दिल्लीतून आलेला एक पक्ष दिल्ली मॉडेल दाखवून पंजाबमधील मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात दिल्ली मॉडेलबाबत जाहिराती केल्या जात आहेत. पण, अशा जाहिरातींना बळी पडू नका. कारण, 2014 केंद्रात आलेल्या भाजपनेही देशासमोर गुजरात मॉडेल ठेवले होते. मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात आल्या. मात्र, झाले काय, असे म्हणत आपसह भाजपवरही प्रियांका गांधी यांनी टीका केली. पंजाब राज्यात 20 फब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला मत मोजणी होणार आहे.
हेही वाचा - Hemanta Sarma vs Rahul Gandhi : असे काय म्हणाले हेमंत बिस्वा शर्मा? ज्यामुळे राजकारण तापलं, काँग्रेस आक्रमक