अलवर (राजस्थान): Car Hit And Run: अलवर सिकंदरा मेगा हायवेवर राजगढजवळ रस्त्याच्या कडेला चहाच्या दुकानात बसलेल्या तीन तरुणांना भरधाव कारने धडक Alwar hit and run case दिली. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक 3 men mowed down by high speed car आहे. हे तिन्ही तरुण उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, हातगाडी विकून आपला उदरनिर्वाह करत होते. मृताच्या नातेवाइकांनी सांगितले की, कारमधील आरोपी उत्तर प्रदेश पोलिसात आहेत आणि दोघांनी मद्य प्राशन केले होते. दारूच्या नशेत कारचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या तिघांना चिरडले.
अलवर-सिकंदरा मेगा हायवेवर राजगढजवळ हा अपघात झाला. या अपघातात फिरोज (वय 23 वर्षे) आणि जावेद (वय 22 वर्षे) यांचा मृत्यू झाला. जावेद विवाहित असून त्याला दोन लहान मुले आहेत. या अपघातात कलीम (वय 30 वर्षे) हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर सर्व जखमींना अलवर येथील राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी 2 जणांना मृत घोषित केले तर कलीमला गंभीर अवस्थेत जयपूरला रेफर करण्यात आले. कलीमवर जयपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मृत आणि जखमींच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.
कुटुंब खूप गरीब आहे - नातेवाईकांनी सांगितले की त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तिघेही लोखंड विकून आपला उदरनिर्वाह करत सिकंदरा तिराहे येथे भाड्याच्या घरात राहत असत.पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.