ETV Bharat / bharat

Good Health : दररोज बदाम खाणे आरोग्यासाठी आहे फायदेकारक - दररोज बदाम खाणे चांगले

एका अभ्यासानुसार (Study), दररोज मूठभर बदाम खाणे आरोग्यासाठी प्रचंड (Almonds are good for gut health) फायदेशिर आहे. याचा फायदा ब्युटीरेट संश्लेषणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी होते. यामुळे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे फॅटी ऍसिड शरीरात तयार होतात. Good Health .researchers from King College London

Good Health
दररोज बदाम खाणे चांगले
author img

By

Published : Oct 21, 2022, 6:56 PM IST

वॉशिंग्टन (यूएस) :एका अभ्यासानुसार (Study), दररोज मूठभर बदाम खाणे आरोग्यासाठी प्रचंड (Almonds are good for gut health) फायदेशिर आहे. याचा फायदा ब्युटीरेट संश्लेषणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी होते. यामुळे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे फॅटी ऍसिड शरीरात तयार होतात. किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधकांच्या पथकाने आतड्यांवरील सूक्ष्मजंतूंच्या संरचनेवर बदामांच्या प्रभावाचा अभ्यास केला. Good Health .researchers from King College London

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये आज प्रकाशित झालेल्या या अभ्यासाला कॅलिफोर्नियाच्या अल्मंड बोर्डाने निधी दिला आहे. आतड्याच्या मायक्रोबायोममध्ये आतड्यात राहणारे हजारो सूक्ष्म जीव असतात. हे पोषक तत्वांचे पचन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात आणि आपल्या आरोग्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकू शकतात, ज्यात आपल्या पाचक आणि रोगप्रतिकारक प्रणालींचा समावेश आहे. आतड्यातील सूक्ष्मजीवांचा मानवी आरोग्यावर कसा प्रभाव पडतो याची यंत्रणा अद्याप तपासली जात आहे. परंतु पुरावे असे सूचित करतात की, विशिष्ट प्रकारचे अन्न खाल्ल्याने आपल्या आतड्यातील जीवाणूंच्या प्रकारांवर किंवा ते आपल्या आतड्यात काय करतात यावर सकारात्मक प्रभाव पडतात.

किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधकांनी 87 निरोगी प्रौढांची नियुक्ती केली, जे आहारात कमी फायबर घेत होते आणि स्वास्थ्यास हानीकारक असे स्नॅक्स खात होते. या सहभागीं व्यक्तींना तीन गटांमध्ये विभागले गेले. त्यातील एका गटाने दिवसातून 56 ग्रॅम संपूर्ण बदाम असलेले स्नॅक्स खाल्ले. दुसर्‍या गटाने दिवसातून 56 ग्रॅम बारीक बदाम असलेले स्नॅक्स खाल्ले. तर नियंत्रण गटाने उर्जा मिळणारे मफिन्स खाल्ले, असे चार आठवडे चालले.

संशोधकांना असे आढळून आले की, बदाम खाणाऱ्यांमध्ये ब्युटीरेट हे मफिन खाणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त होते. ब्यूटीरेट हे शॉर्ट-चेन फॅटी ऍसिड आहे, जे कोलनचे अस्तर असलेल्या पेशींसाठी इंधनाचा मुख्य स्त्रोत आहे. जेव्हा या पेशी प्रभावीपणे कार्य करतात, तेव्हा ते आतड्यांतील सूक्ष्मजंतूंची भरभराट होण्यासाठी, आतड्याची भिंत मजबूत करण्यासाठी आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी एक आदर्श स्थिती निर्माण करते. तसेच बादाम खाणाऱ्या व्यक्तिंच्या आतड्यांच्या संक्रमणाच्या वेळेत कोणताही महत्त्वाचा फरक आढळला नाही. अन्नाला आतड्यांमधून जाण्यासाठी लागणारा वेळ हा ईतर अन्न खाणाऱ्याच्या तुलनेत लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी होता. तसेच संपूर्ण-बदाम खाणाऱ्यांची इतरींच्या तुलनेत दर आठवड्याला 1.5 आतड्याची हालचाल अतिरिक्त होते. हे निष्कर्ष असे सूचित करतात की, बदाम खाल्ल्याने बद्धकोष्ठता असलेल्यांना देखील फायदा होऊ शकतो.

चाचणीत असे दिसून आले आहे की, संपूर्ण आणि ग्राउंड बदाम खाल्ल्याने लोकांच्या आहारात सुधारणा होते. मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्, फायबर, पोटॅशियम आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक घटकांचे सेवन जास्त होते. प्रमुख लेखक व किंग्स कॉलेज लंडनमधील पोषण विज्ञान विभागाचे प्रमुख म्हणाले की, आतड्यांतील मायक्रोबायोटा हे मानवी आरोग्यावर परिणाम करण्याचा एक भाग आहे. म्हणजे शॉर्ट-चेन फॅटी ऍसिडचे उत्पादन हे रेणू कोलनमधील पेशींसाठी इंधन स्रोत म्हणून काम करतात. ते आतड्यांमधील इतर पोषक तत्वांचे शोषण नियंत्रित करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती संतुलित करण्यास मदत करतात. आम्हाला असे वाटते की, हे निष्कर्ष असे सूचित करतात की, बदामाच्या सेवनाने बॅक्टेरियाच्या चयापचयाला अशा प्रकारे फायदा होऊ शकतो ज्याची मानवी आरोग्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. Good Health . researchers from King College London

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.