ETV Bharat / bharat

Azam Khan: आझम खानला उच्च न्यायालयाचा झटका, द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी याचिका फेटाळली - आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाचा झटका

आझम खान यांनी 2019 सालच्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी सुरू असलेला खटला थांबवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. (Azam Khan plea to stay trial). रामपूरच्या विशेष न्यायालयाने 27 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी निकाल देताना आझम खानला दोषी ठरवून 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Azam Khan
Azam Khan
author img

By

Published : Nov 16, 2022, 9:05 PM IST

प्रयागराज - द्वेषपूर्ण भाषणा प्रकरणी आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी दाखल करण्यात आलेली आझम खान यांची याचिका निराधार असल्याचे कारण देत फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती समित गोपाल यांनी हा आदेश दिला आहे.

न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे - आझम खान यांनी 2019 सालच्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी सुरू असलेला खटला थांबवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. रामपूरच्या विशेष न्यायालयाने 27 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी निकाल देताना आझम खानला दोषी ठरवून 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. दोषी आढळल्याने आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासोबतच आता रामपूर जागेवर पोटनिवडणूक होत आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयामुळे आझम खान यांची याचिका निराधार झाली आहे.

काय आहे प्रकरण? : द्वेषपूर्ण भाषणाचे प्रकरण 2019 लोकसभा निवडणुकीच्या काळातील आहे. रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या भाषणादरम्यान आझम खान यांनी आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या. त्यांनी तत्कालीन डीएम, सीएम योगी आणि पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. 27 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने याच प्रकरणात सुनावणी केल्यानंतर आझम खानला दोषी ठरवले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.