ETV Bharat / bharat

'मॉब लिंचिंग करणारे लोक हिंदुत्वाच्या विरोधात'; सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान - RSS

सरसंघचालक मोहन भागवत यांनी गाझियाबाद येथे आयोजित राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण केले. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना हिंदू-मुस्लिम वेगळे नाही, सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, असे विधान त्यांनी केले.

मोहन भागवत
मोहन भागवत
author img

By

Published : Jul 5, 2021, 9:00 AM IST

Updated : Jul 5, 2021, 9:16 AM IST

गाझियाबाद - भारतीय कोणत्याही धर्माचे असले तरी, त्या सर्वांचा डीएनए हा एकच असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत रविवारी एका कार्यक्रमात म्हटलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी गाझियाबाद येथे आयोजित राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण केले. यावेळी मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंगच्या घटनांवरीही भाष्य केले. लिंचिंगमध्ये सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे. तसेच लिंचिंगची काही खोटे प्रकरणे नोंदविण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान

भारतात इस्लाम संकटात आहे, या चक्रात पडू नका. देशात एकता झाल्याशिवाय विकास शक्य नाही. ऐक्याचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा अभिमान असावा. हिंदू-मुस्लिम संघर्षाचा एकमेव तोडगा म्हणजे 'संवाद' आहे, 'विसंवाद' नाही, असे ते म्हणाले. तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याची चर्चा दिशाभूल करणारी आहे. कारण, ते वेगळे नसून एक आहेत. आपण सर्व जण गेल्या 40 हजार वर्षांपासून एका पुर्वजांचे वंशज आहोत. सर्व भारतीयांचे डीएनए एकच आहे, असे भागवत म्हणाले.

उपासना करण्याच्या पद्धतींवरून लोकांमध्ये फरक करता येणार नाही. आपण लोकशाहीमध्ये आहोत. त्यामुळे हिंदू किंवा मुस्लिम यांचे वर्चस्व असू शकत नाही. येथे फक्त भारतीयच वर्चस्व गाजवू शकतात, असे सरसंघचालक म्हणाले. संघ ना राजकारणात आहे आणि ना कोणतीही प्रतिमा टिकवण्याची काळजी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (राष्ट्र) सबलीकरणासाठी आणि समाजातील सर्व लोकांच्या कल्याणासाठी आपले कार्य करत असल्याचे संघाचे प्रमुख म्हणाले.

भारत हे एक हिंदू राष्ट्र -

यापूर्वी मॉब लिंचिंगच्या घटनांमधून हिंदू धर्म आणि संस्कृतीला बदनाम करण्याचे मोठे कारस्थान सुरु असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला होता. 'भारत हे एक हिंदू राष्ट्र असून ही गोष्ट कधीच बदलू शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी याआधी केले होते. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील आंबेकर यांनी लिहलेलं ‘द आरएसएस : रोडमॅप फॉर ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. भारताला आपली मातृभूमी माननारा आणि तिच्यावर प्रेम करणारा व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत हिंदू जिवंत आहे. देशाच्या बाहेरून येणाऱया लोकांनाही आम्ही आपले मानले आहे. आपण सर्व विचारधारा बदलू शकतो. मात्र 'भारत हे एक हिंदू राष्ट्र' आहे. ही गोष्ट बदलू शकत नाही, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा - 'पुरुषांना महिलांसोबत कसे वागावे याचे शिक्षण घरातूनच द्यायला हवे', मोहन भागवतांचे प्रतिपादन

Last Updated : Jul 5, 2021, 9:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.