ETV Bharat / bharat

स्व:ताला 'जिवंत' सिद्ध करण्यासाठी व्यवस्थेसोबत झगडताय 66 वर्षीय वृद्ध आजोबा

राजस्थानच्या टोंकमधील एक 66 वर्षीय व्यक्ती स्व:ताला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी झटत आहे.

स्व:ताला 'जिवंत' सिद्ध करण्यासाठी व्यवस्थेसोबत झगडताय 66 वर्षीय वृद्ध आजोबा
स्व:ताला 'जिवंत' सिद्ध करण्यासाठी व्यवस्थेसोबत झगडताय 66 वर्षीय वृद्ध आजोबा
author img

By

Published : May 19, 2021, 7:40 PM IST

जयपूर - नुकताच पंकज त्रिपाठी यांचा 'कागज' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये दाखवण्यात आले आहे की एक माणूस कशा प्रकारे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की तो जिवंत आहे. ही चित्रपटाची कथा आहे. मात्र, वास्तविक जीवनातही काही जणांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो. अशी घटना टोंकमध्ये समोर आली आहे. एक 66 वर्षीय व्यक्ती तो जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी झटत आहे.

स्व:ताला 'जिवंत' सिद्ध करण्यासाठी व्यवस्थेसोबत झगडताय 66 वर्षीय वृद्ध आजोबा

बरौनी गावात राहणारा रामफूल ( 66) यांना सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत दरमहा पेन्शन मिळत होती. परंतु जेव्हा त्याला 2020 च्या डिसेंबरमध्ये पेन्शन मिळाली नाही. तेव्हा ते बँकेत गेले. तेव्हा 25 जानेवारीपासून त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे बँकेने सांगितले. ज्यामुळे त्यांची पेन्शन बंद करण्यात आली. यानंतर रामफूल यांनी पंचायतीत जाऊन आपला जिवंत असल्याचा पुरावा दाखविला. मात्र, त्यांचे कोणी ऐकले नाही.

गेल्या 6 महिन्यांपासून, रामफुल आपली पेन्शन सुरू करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. या पेन्शनच्या माध्यमातूनच ते आपला खर्च भागवत होते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ती त्याच्याकडून काढून घेण्यात आली.

नेमकं काय झाल?

बरौनी गावात रामपूर योगी नावाच्या व्यक्तीची हत्या झाली. पण रामपूर योगी ऐवजी पंचायतीने रामफूलला सरकारी कागदपत्रांत मृत घोषित केले. ज्यानंतर रामफूलची दरमहा मिळणारी पेन्शन बंद झाली. रामफूल यांना चुकून मृत घोषित करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी त्यांचा अर्ज पाठविण्यात आला आहे. कोरोनामुळे सरकारी कामे रखडली आहेत, असे स्पष्टीकरण ग्रामविकास अधिकारी लोकेश गुर्जर यांनी दिले.

हेही वाचा - सीबीआयने ममता बॅनर्जींना बनवले पक्षकार; पश्चिम बंगालच्या बाहेर खटला वर्ग करण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.