अलीगढ (यूपी) : कतारमध्ये काम करणाऱ्या पतीने (aligharah husband gave triple talaq) पत्नीला मोबाईल व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाक (triple talaq on mobile) दिला. व्हॉट्सअॅपवर दिलेल्या या घटस्फोटामुळे (triple talaq on WhatsApp) विवाहित महिला नाराज आहे. शुक्रवारी ती न्यायासाठी एसएसपीकडे पोहोचली. दुसरीकडे एसएसपी कलानिधी नैथानी यांनी पीडितेच्या तक्रारीची तातडीने दखल घेत संबंधित स्टेशन प्रभारींना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. (triple talaq in aligarh), (UP Aligarh Triple Talaq Case)
अतिरिक्त हुंड्याची मागणी- मिळालेल्या माहितीनुसार, अनीस अहमद (रा. मोहल्ला चाहकथौटी, पोलीस स्टेशन कोतवाली, जिल्हा मथुरा) याने डिसेंबर २०१८ मध्ये अलिगढमधील दिल्ली गेट भागातील जमालपूर येथील रहिवासी अब्दुल रशीद मुलगा अब्दुल वाहीद याच्यासोबत आपली मुलगी इलमखानचा विवाह केला होता. पीडितेचा आरोप आहे की, लग्नानंतर सासरचे लोक दररोज अतिरिक्त हुंड्याची मागणी करत होते. मागणी पूर्ण न केल्याने तो तिला मारहाण करायचा. आता तिच्या पतीने तिला कतार (सौदी अरेबिया) येथून व्हॉट्सअॅप चॅटवर तिहेरी तलाक लिहून पाठवले आहे. पीडित इलमा खानने तक्रार घेऊन शुक्रवारी एसएसपी कार्यालय गाठले. याची तातडीने दखल घेत एसएसपींनी स्टेशन प्रभारींना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
एसएसपींनी दिेले कारवाईचे आश्वासन - तक्रार घेऊन एसएसपी कार्यालयात पोहोचलेल्या पीडितेने सांगितले की, डिसेंबर 2018 मध्ये शहरातील जमालपूर भागात तिचे लग्न झाले होते. तिच्या पतीने व्हॉट्सएपवर तीन वेळा तलाक पाठवला आहे. अब्दुल रशीद असे तिच्या पतीचे नाव असून तो जमालपूर भागातील रहिवासी आहे. 2 वर्ष तो तिला कतारला बोलावेल अशी बतावणी करत होता पण तो आला नाही. त्याचबरोबर त्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तिहेरी तलाक दिला आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी तिने शुक्रवारी एसएसपी कार्यालय गाठले. एसएसपींनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्याच्या आधारे योग्य कलमांतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे तपास सुरू आहे.