ETV Bharat / bharat

Gunmen Attack Hotel In Somalia सोमालियात दहशतवाद्यांचा हॉटेलवर हल्ला, 12 ठार - al shabaab gunmen attack hotel in mogadishu in somalia

अल शबाबच्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी सोमालियातील मोगादिशू येथील एका हॉटेलवर हल्ला केला al shabaab gunmen attack hotel in mogadishu. यादरम्यान स्फोट आणि गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

AL SHABAAB GUNMEN ATTACK
AL SHABAAB GUNMEN ATTACK
author img

By

Published : Aug 20, 2022, 12:01 PM IST

Updated : Aug 20, 2022, 12:08 PM IST

मोगादिशू : शहरातील हयात हॉटेलवर अल शबाबच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला al shabaab gunmen attack hotel in mogadishu. यादरम्यान हल्लेखोरांनी दोन कार बॉम्बचा स्फोट केला आणि गोळीबार केला. या हल्ल्यात 12 नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. हयात हॉटेलमधून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. Gunmen Attack Hotel In Somalia

हयात हॉटेलवरील हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि जिहादी गटाच्या बंदुकधारींमध्ये जोरदार गोळीबार झाला. बंदूकधारी अजूनही इमारतीत लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. साक्षीदारांनी सांगितले की, अल-शबाबच्या सैनिकांनी शुक्रवारी सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील एका हॉटेलवर गोळीबार आणि स्फोटांनी हल्ला केला. या हल्ल्यात 12 जण ठार झाले.

दहशतवाद्यांनी जबरदस्तीने हॉटेलमध्ये घुसण्याच्या काही मिनिटांपूर्वी मोठा स्फोट झाला. सुरक्षा दल अजूनही इमारतीच्या आत लपून बसलेल्या हल्लेखोरांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पहिल्या स्फोटानंतर काही मिनिटांनंतर हॉटेलच्या बाहेर दुसरा स्फोट झाला, ज्यामध्ये बचाव पथकाचे सदस्य आणि पहिल्या स्फोटानंतर घटनास्थळी पोहोचलेले सुरक्षा दलाचे सदस्य आणि नागरिक जखमी झाले. सध्या या भागाला वेढा घातला असून सुरक्षा दल आणि बंदूकधाऱ्यांमध्ये गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा Threat message to attack Mumbai मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानातून आली धमकी

Last Updated : Aug 20, 2022, 12:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.