ETV Bharat / bharat

वडोदरामध्ये आगळे- वेगळे एअरक्राफ्ट रेस्टॉरंट जनतेसाठी खुले; प्रत्यक्ष हवाई प्रवासाचा अनुभव - वडोदरा

एक आगळे-वेगळे रेस्टॉरंट गुजरातमध्ये सुरू झाले आहे. गुजरातच्या लोकांसाठी एअरक्राफ्ट रेस्टॉरंट खुले झाले आहे. वडोदरा शहरातील तरसाली बायपासजवळ हे रेस्टॉरंट आहे. एअरक्राफ्ट थीम असलेल्या जगातील एकूण रेस्टॉरंटपैकी हे 9 वे रेस्टॉरंट आहे. तर भारतात याचा चौथा क्रमांक लागतो.

Aircraft-themed restaurant opened in Gujarat's Vadodara
वडोदरामध्ये आगळे- वेगळे एअरक्राफ्ट रेस्टॉरंट जनतेसाठी खुले; प्रत्यक्ष हवाई प्रवासाचा अनुभव
author img

By

Published : Oct 28, 2021, 12:32 PM IST

अहमदाबाद - रेस्टॉरंटमध्ये जेवण्यास जाण्यासाठी आजकाल आपल्याला कोणतेही निमित्त पुरत असते. यासाठी आपण विशेष आशा रेस्टॉरंटची निवड करतो. असेच एक आगळे-वेगळे रेस्टॉरंट गुजरातमध्ये सुरू झाले आहे. गुजरातच्या लोकांसाठी एअरक्राफ्ट रेस्टॉरंट खुले झाले आहे. वडोदरा शहरातील तरसाली बायपासजवळ हे रेस्टॉरंट आहे. एअरक्राफ्ट थीम असलेल्या जगातील एकूण रेस्टॉरंटपैकी हे 9 वे रेस्टॉरंट आहे. तर भारतात याचा चौथा क्रमांक लागतो.

  • "The restaurant will make you feel like you are travelling in a real-life aircraft. Different food options available here, including Punjabi, Chinese, Continental, Italian, Mexican and Thai," MD Mukhi added on Wednesday. pic.twitter.com/wNZOeDpjJC

    — ANI (@ANI) October 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एअरक्राफ्ट रेस्टॉरंट तयार करण्यासाठी बंगळुरूमधील एका कंपनीकडून 1.40 कोटी रुपयांचा एअरबस 320 खरेदी करण्यात आल्याचे रेस्टॉरंट मालकाने सांगितले. विमानाचा प्रत्येक भाग वडोदरा येथे आणण्यात आल्यानंतर त्यांचे एका रेस्टॉरंटमध्ये रुपांतर करण्यात आले. हे एअरक्राफ्ट रेस्टॉरंट उभारण्यास एकूण खर्च 2 कोटी आला आहे. यात 102 लोक एकाचवेळी बसू शकतात. भंगार विमानाचा वापर करून हे रेस्टॉरंट उभारले आहे.

या एअरक्राफ्ट रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला पूर्ण विमानाचा फिल येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील वेटर स्टीवर्ड आणि एअर होस्टेसप्रमाणे सेवा देतात. रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर विमानात बसल्यासारखे वाटते. येथे वारंवार घोषणाही केल्या जातात. येथे भरपूर खाद्य पर्याय उपलब्ध आहेत. यात पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेंटल, इटालियन, मेक्सिकन आणि थाई पदार्थ यांचा समावेश आहे. ही माहिती एमडी मुखी यांनी दिली.

हेही वाचा - VIDEO : सीएसएमटी स्थानकात 'रेस्टॉरंट ऑन व्हील' प्रवासी,पर्यटकांच्या सेवेत खुले!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.