ETV Bharat / bharat

उड्डान भरल्यानंतर विमानात आढळलं वटवाघूळ; आकाशातच घ्यावा लागला यू-टर्न - विमानात आढळलं वटवाघूळ

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरून गुरुवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने उड्डान घेतले. मात्र, विमानात वटवाघूळ आढळल्यानंतर विमानाची परत लँडिंग करावी लागली.

विमान
विमान
author img

By

Published : May 28, 2021, 8:42 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर अजबच घटना घडली आहे. गुरुवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने उड्डान घेतले. मात्र, विमानात वटवाघूळ आढळल्यानंतर विमानाची परत लँडिंग करावी लागली. विमानाने गुरवारी सकाळी 2 वाजून 20 मिनिटांनी उड्डान घेतले होते. त्यांच्या 30 मिनिटानंतर विमानात वटवाघूळ असल्याचे आढळल्यानंतर विमानाची दिल्लीत सकाळी 3:55 वाजता लँडिंग करण्यात आली.

दिल्ली विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने न्यूवार्कच्या दिशेने उड्डान घेतले. उड्डान घेतल्याच्या 30 मिनीटानंतर कर्मचाऱ्यांना विमानात वटवाघूळ आढळली. यावर वैमानिकाने परत दिल्लीकडे विमान वळवण्याचा निर्णय घेतला. AI-105 DEL-EWR विमानासाठी आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली आणि विमानाचे लँडिंग करण्यात आले.

वन्यप्राणी विभागाच्या कर्मचाऱ्यांना वटवाघूळ पकडण्यासाठी बोलवण्यात आले. विमानात धूर केल्यानंतर मृत वटवाघूळ विमानातील बिझनेस क्लासमध्ये आढळले. सविस्तर तपासणीसाठी या घटनेची माहिती विमान कंपनीच्या उड्डाण सुरक्षा विभागाला देण्यात आली. प्रवाशांना दुसर्‍या विमानात हलविण्यात आले आणि एअर इंडियाचे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.35 वाजता न्यवार्कमध्ये दाखल झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.