ETV Bharat / bharat

Air India ferry flight : अडकलेल्या अमेरिकेन प्रवाशांसाठी एअर इंडियाच्या फेरी विमानाचे मुंबईहून रशियाकडे उड्डाण - एअर इंडिया फेरीचे रशियाला उड्डाण

एअर इंडियाचे AI173 विमान मंगळवारी दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होते. परंतु विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हे विमान रशियाच्या मगदानकडे वळवण्यात आले होते. तेथील प्रवाशांना सॅन फ्रान्सिस्कोला घेऊन जाण्यासाठी आज एअर इंडियाच्या फेरी फ्लाइटने उड्डाण केले.

Flight of Air India to Russia
एअर इंडियाच्या विमानाचे रशियाकडे उड्डाण
author img

By

Published : Jun 7, 2023, 3:20 PM IST

मुंबई : एअर इंडियाच्या फेरी फ्लाइटने रशियाच्या मगदानकडे आज उड्डाण घेतले. या विमानातून रशियामध्ये अडकलेल्या प्रवाशांना सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचवले जाणार आहे. मंगळवारी एअर इंडियाचे AI173 विमान नवी दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होते. परंतु या विमानातील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे एअर इंडियाचे हे विमान रशियाच्या मगदानला वळण्यात आले होते.

कंपनीचे निवदेन : रशियाच्या मगदानात उतरवण्यात आलेल्या AI173 विमानातील प्रवाशांना एअर इंडियाला सॅन फ्रॉन्सिस्कोला घेऊन जात आहे. एअर इंडियाने याविषयी एक निवदेन जारी केले आहे. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, "07 जून 2023 रोजी IST 1300 तासांनी मुंबई, भारत (BOM) येथून GDX ला एक फेरी उड्डाण नियोजित होते. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या नियामक मंडळाच्या मंजुरीनंतर प्रवासी आणि AI173 च्या क्रूला सॅन फ्रान्सिस्कोला नेले जाणार आहे.

प्रवाशांना राहण्यासाठी हॉटेल्स सुविधा : सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानात 216 प्रवासी आणि 16 क्रू होते. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर मगदान रशिया येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले होते. एअर इंडियाला प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची चिंता आहे. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लवकरात लवकर विमानाचे उड्डाण केले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची हमी कंपनीकडून घेतली जात असल्याचे एअर इंडियाने सांगितले. दरम्यान एअरलाइन कंपनी सांगितले की, विमान वळण्यात आले तेव्हा मगदान विमानतळावरील स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला होता. त्यांनी विमानाच्या आगमनासाठी सर्व सहकार्य केले. एअर इंडिया कंपनीने आपल्या निवदेनात पुढे म्हटले की, तेथील स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने स्थानिक पातळीवर प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी जागा देण्यात आली. यासाठी स्थानिक पातळीने प्रामाणिक प्रयत्न केले.

दुतावासाची घेतली मदत : एअर इंडियाकडे मागदान या दुर्गम शहरामध्ये किंवा रशियामध्ये राहणारा कोणताही कर्मचारी नव्हता. यामुळे कंपनीने व्लादिवोस्तोक येथील भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधत (भारत सरकार), भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क केला. भारतीय दुसातवासाच्या मदतीने प्रवाशांना विमानतळावर मदत पुरवण्यात आलेल्या कंपनीनेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा -

  1. Air India Scorpion : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिलेला चावला विंचू; कंपनीने दिले 'हे' स्पष्टीकरण
  2. Delhi Bangkok Flight Delay : एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्यामुळे 300 प्रवाशांना झाला त्रास, खाण्यापिण्याच्या व्यवस्थेवर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.