नई दिल्ली -दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सीबीआयच्या छापेमारी केली आहे. त्यानंतर आप आणि भाजपमधील राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. Manish Sisodia सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
-
मेरे पास भाजपा का संदेश आया है- “आप” तोड़कर भाजपा में आ जाओ, सारे CBI ED के केस बंद करवा देंगे
— Manish Sisodia (@msisodia) August 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मेरा भाजपा को जवाब- मैं महाराणा प्रताप का वंशज हूँ, राजपूत हूँ। सर कटा लूँगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियोंके सामने झुकूँगा नहीं। मेरे ख़िलाफ़ सारे केस झूठे हैं।जो करना है कर लो
">मेरे पास भाजपा का संदेश आया है- “आप” तोड़कर भाजपा में आ जाओ, सारे CBI ED के केस बंद करवा देंगे
— Manish Sisodia (@msisodia) August 22, 2022
मेरा भाजपा को जवाब- मैं महाराणा प्रताप का वंशज हूँ, राजपूत हूँ। सर कटा लूँगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियोंके सामने झुकूँगा नहीं। मेरे ख़िलाफ़ सारे केस झूठे हैं।जो करना है कर लोमेरे पास भाजपा का संदेश आया है- “आप” तोड़कर भाजपा में आ जाओ, सारे CBI ED के केस बंद करवा देंगे
— Manish Sisodia (@msisodia) August 22, 2022
मेरा भाजपा को जवाब- मैं महाराणा प्रताप का वंशज हूँ, राजपूत हूँ। सर कटा लूँगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियोंके सामने झुकूँगा नहीं। मेरे ख़िलाफ़ सारे केस झूठे हैं।जो करना है कर लो
षडयंत्र रचणाऱ्या लोकांसमोर झुकणार नाही मनीष सिसोदिया यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. Delhi Deputy Chief Minister Sisodia tweet ते म्हणाले, की मला भाजपकडून एक मेसेज आला आहे, ज्यामध्ये आपण आपला सोडून भाजपमध्ये या, सीबीआय-ईडीचे सर्व खटले बंद करण्यात येतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. त्यावर मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, माझे मुंडके कापले तरी मी भ्रष्टार करणाऱ्या, षडयंत्र रचणाऱ्या लोकांसमोर झुकणार नाही असे म्हत त्यांनी माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यामुळे तुम्हाला जे करायचे आहे ते करा मी घाबरत नाही असही सिसोदिया म्हणाले आहेत.
गुजरातसाठी काय केले दरम्यान, सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, मी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर जात आहे. ज्या पद्धतीने दिल्लीत काम झाले आहे आणि पंजाबमध्ये काम सुरू आहे. यामुळे प्रभावित होऊन गुजरातच्या जनतेला केजरीवाल यांना संधी द्यायची आहे. भाजपने पहिल्या 27 वर्षात गुजरातसाठी काय केले नाही हे केजरीवाल सरकार दाखवून देईल असही ते म्हणाले आहेत.
पकडल्यावर प्रत्येक चोर रडतो यानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही ट्विट केले आहे की, आयुष्यभर औरंगजेबाची पूजा केली आणि चोरी, लाचखोरीप्रकरणी तुरुंगात जाण्याची वेळ आली तेव्हा महाराणा प्रतापांची आठवण झाली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, केस माफ करून भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही किती पापड केले. हे माध्यम आणि राजकीय वर्तुळातील सर्वांना माहीत आहे. ते म्हणाले की, पकडल्यावर प्रत्येक चोर रडतो असही ते म्हणाले आहेत.
काय आहेत प्रकरण दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22 च्या अंमलबजावणीत कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये 15 इतर संस्थांसह सिसोदिया यांचे नाव आहे. शुक्रवारी सीबीआयने सिसोदिया यांचे निवासस्थान आणि काही व्यावसायिकांच्या निवासस्थानांसह 31 ठिकाणी छापे टाकले होते. या छापेमारीनंतर सिसोदिया यांनी ट्विट करून आपण अशा कारवायांना घाबरत नसल्याचे म्हटले होते.
आरोपी म्हणून सिसोदिया यांचा समावेश तुमचे सर्व छापे अयशस्वी झाले आहेत. काहीही सापडले नाही. एका पैशाचाही गैरवापर झाल्याचे आढळून आले नाही. आता तुम्ही लूकआउट नोटीस जारी केली आहे. ही काय नौटंकी आहे मोदीजी मी दिल्लीत मुक्तपणे फिरत आहे. कुठे यायचे ते सांगा, असे ट्विट सिसोदिया यांनी केले होते. सीबीआयने अबकारी धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेच्या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून सिसोदिया यांचा समावेश आहे.
देशाची प्रगती कशी होणार दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी देखील या प्रकरणी टीका केली आहे. रोज सकाळी केंद्र सरकार सीबीआय ईडीचा खेळ सुरू करते. सर्वसामान्य माणूस महागाईशी लढत आहे, कोट्यवधी युवक बेरोजगार आहेत, अशा वेळी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांसह बेरोजगारी आणि महागाईशी लढले पाहिजे. त्याऐवजी ते संपूर्ण देशाशी लढत आहेत. रोज सकाळी उठून सीबीआय-ईडीचा खेळ सुरू आहे. अशाने देशाची प्रगती कशी होणार असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या IS दहशतवाद्याला रशियाने पकडले