ETV Bharat / bharat

राणेंच्या धमकीनंतर संजय राऊत यांचे मराठी अस्मितेचे कार्ड, थेट मोदी-शाह यांनाच केला सवाल - Guwahati Assam

राज्यातील राजकारणाला नवीन वळण घेत आहे. आता ही लढाई मराठी अस्मितेवर येऊन लागली आहे, असे वेगवेगळ्या घडामोडी तसेच वक्तव्यांवरुन दिसते. कालची शरद पवार यांची पत्रकार परिषद, त्यानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी त्यांनंतर केलेले ट्विट चर्चेत आले. तसेच राणे यांच्या ट्विटवर सवाल करुन संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनाच सवाल केला. त्यांचे राणे यांच्या वक्तव्याला त्यांचे समर्थन आहे का, हे सांगावे असे राऊत म्हणाले. या सगळ्या घडामोडी पाहता राज्याचे राजकारण आता वेगळ्या पातळीवर जात आहे. तसेच यामध्ये मराठी अस्मिता विरुद्ध केंद्र असे चित्र पुढे येत असल्याचे दिसते.

राणेंच्या धमकीनंतर संजय राऊत यांचे मराठी अस्मितेचे कार्ड

author img

By

Published : Jun 24, 2022, 12:10 PM IST

Updated : Jun 24, 2022, 1:05 PM IST

हैदराबाद - महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामध्ये गेल्या 12 तासात राज्यातील राजकारणाला नवीन वळण घेत आहे. आता ही लढाई मराठी अस्मितेवर येऊन लागली आहे, असे वेगवेगळ्या घडामोडी तसेच वक्तव्यांवरुन दिसते. कालची शरद पवार यांची पत्रकार परिषद, त्यानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी त्यांनंतर केलेले ट्विट चर्चेत आले. तसेच राणे यांच्या ट्विटवर सवाल करुन संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनाच सवाल केला. त्यांचे राणे यांच्या वक्तव्याला त्यांचे समर्थन आहे का, हे सांगावे असे राऊत म्हणाले. या सगळ्या घडामोडी पाहता राज्याचे राजकारण आता वेगळ्या पातळीवर जात आहे. तसेच यामध्ये मराठी अस्मिता विरुद्ध केंद्र असे चित्र पुढे येत असल्याचे दिसते.

शरद पवार नेमके काय म्हणाले - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा यांनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आमदार फुटल्याच्या संदर्भात सविस्तरपणे आपले मत मांडले. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर ( Sharad pawar warning to rebel shivsena mla ) आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी ( Sharad pawar on anti defection law ) कायद्याच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे त्याचे परिणाम ( Sharad pawar comment on rebel shivsena mla ) त्यांना भोगावे लागतील, अशा गर्भित इशाराही त्यांनी दिला. एवढेच नाही तर त्या-त्या आमदारांच्या मतदारसंघातही त्यांच्या कृतीची प्रतिक्रिया उमटेल. त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत, असे शरद पवार यांनी सांगितले.

राणेंच्या धमकीनंतर संजय राऊत यांचे मराठी अस्मितेचे कार्ड

नारायण राणे यांचे ट्विट - शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटाला दिलेल्या गर्भित इशाऱ्यानंतर भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करुन आपले मत मांडले. शरद पवार हे आमदारांना धमकी देत असल्याचा आरोपच राणे यांनी ट्विटमधून केला. शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना पक्षांतर बंदीचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा शरद पवार यांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणे यांनी विधानसभेतील बंडखोर आमदारांचे कोणतेही नुकसान झाले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा उलट इशारा दिला. राणेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल.'

संजय राऊत यांची प्रतिक्रिया - नारायण राणे यांच्या ट्विटनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांची भूमिका भाजप पक्षाची असेल तर त्यांनी तसे घोषित करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे म्हणतात, रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल. पण शरद पवार यांच्याबाबत ( Narayan Rane on Sharad Pawar ) अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही. शरद पवारांना धमकी देण्याइतका काही नेत्यांचा माज वाढला आहे. आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांच्या निष्ठेची कसोटी लागणार आहे. शरद पवारांना धमक्या देण्याइतका माज काही नेत्यांचा वाढला आहे. त्यांचा विचार पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना करावा लागणार आहे. मोदी आणि शाह यांचे समर्थन नारायण राणे यांच्या धमकीला आहे का, असा सवालच राऊत यांनी यातून विचारला आहे.

राजकीय तज्ञांच्या प्रतिक्रिया - शरद पवार यांनी धमकी दिल्याबाबत नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर शरद पवारांनी जरी संख्याबळाबाबत वक्तव्य केले असले तरी त्यात गर्भित धमकीच होती असे राजकीय तज्ञांना वाटते. यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार म्हणतात, शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन संख्याबळ सिद्ध करून दाखवावे असे म्हटले आहे यात त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना गर्भित धमकी दिल्याचं भावसार यांना वाटते. एक प्रकारे तुम्ही संख्याबळ सिद्ध करून दाखवता कसे करता पाहू, असा या वाक्याचा आशय असल्याचे भावसार यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी आपल्या वक्तव्यामध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदारांना तुम्हाला महाराष्ट्रातच यावे लागणार आहे असे म्हटले आहे. तुमची आमदारकी रद्द होऊ शकते असा गर्भित इशारा या वाक्यात आहे. तसेच भावी निवडणुकीत तुम्हाला शिवसैनिक जागा दाखवतील. तुम्ही संख्याबळ सिद्ध करून दाखवा तुम्हाला महाराष्ट्रातच राहायचे आहे असाही या वाक्याचा अर्थ नारायण राणे यांनी घेतला असावा. त्यामुळे या वाक्यातून गर्भित धमकीच प्रतीत होते असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांना वाटते.

मराठी अस्मितेचे राजकारणाला वळण - शरद पवार, नारायण राणे तसेच संजय राऊत यांच्या क्रिया आणि प्रतिक्रियांचा विचार केल्यावर राज्याचे राजकारणात आता केंद्राला ओढण्यात येत असल्याचे स्पष्ट होते. त्यातून संजय राऊत यांचे सवाल थेट मोदी आणि शाह यांना असल्याने एकप्रकारे मराठी माणसांच्या राजकारणात बाहेरचे लोक ढवढाढवळ करत असल्याचे राऊत यांना सांगायचे आहे, असेही मानण्यात येत आहे. शिवसेनेचे बंड हे भाजपच्या इशाऱ्यावर त्यांच्या सहयोगानेच झाले असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. आता या राजकीय परिस्थितीचे खापर मोदी-शाह यांच्यावर फोडण्यात राज्यातील राजकारणी किती यशस्वी होतात हे येणाऱ्या काळात समजेलच.

हेही वाचा - शिवसेना बंडखोरांच्या दिमतीला आसाममध्ये भाजप नेत्यांची टीमच.. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे 'हे' पाच शिलेदार मैदानात..

Last Updated : Jun 24, 2022, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.