नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद केल्यानंतर ट्विटरने आता मोठी कारवाई केली आहे. ट्विटरने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत ट्विटर अकाउंट हे बंद केले आहे. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई केली आहे. याबाबत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता म्हणाले, की लोकांचे प्रश्न उपस्थित करण्यापासून पक्षाला कोणीही रोखू शकत नाही.
ट्विटर सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा दावा एआयसीसीच्या सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी केला. ट्विटरने काँग्रेसच्या 5 हजार नेते आणि कार्यकर्त्यांचे अकाउंट बंद केले आहेत. गुप्ता म्हणाले, की जर नियमांचे उल्लंघन असेल तर मागासवर्गीय पीडितेच्या कुटुंबाचा फोटो हा मागास आयोगाच्या ट्विटर अकाउंटवर 2 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट का होता, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा-केरळ सोने तस्करी प्रकरण : केरळ सरकारला मोठा धक्का, ईडीविरोधात चौकशी होणार नाही
आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही- रोहन गुप्ता
4 ऑगस्टला राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी प्रश्नाबाबत आवाज उठविला. त्यानंचर ट्विटरने त्यांचे अकाउंट लॉक केले. तर त्यांचे ट्विट बंद केले. ही दुटप्पी भूमिका आहे. हे दबावाखाली घडत आहे. लोकांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. त्यांनी आमच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे 5 हजारांहून अधिक ट्विटर अकाउंट ब्लॉक केली आहेत. ट्विटरने समजून घ्यावे, की ते दबावाखाली काम करू शकतात. मात्र, लोकांचे प्रश्न उपस्थित न करण्यासाठी आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नसल्याचे रोहन गुप्ता यांनी म्हटले.
हेही वाचा-झारखंडमधील दोन सायबर गुन्हेगारांना महाराष्ट्राच्या पुणे शहरातून अटक
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक
बुधवारी ट्विटरने काँग्रेसच्या 5 वरिष्ठ नेत्यांचे अकाउंट ब्लॉक केले. काँग्रेसचे संवाद सचिव विनीत पुनिया यांनी ट्विटमध्ये म्हटले, की एआयसीसीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, पक्षाचे महासचिव रणदीप सिंह सुरजेवाला, पक्षाचे खासदार टागोर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह अलवार यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले आहे. हे @RahulGandhi, @rssurjewala, @ajaymaken, @sushmitadevinc, @manickamtagore ट्विटर अकाउंट बंद केल्याने भारतीय लोकांना ट्विटरने निराश केले आहे. ट्विटरवर मुक्त आवाजाचे स्वागत नाही. त्यांच्या इनस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करू, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-महाराष्ट्राशेजारील कर्नाटकात कोरोनाची तिसरी लाट, 242 लहान मुलांना कोरोनाची लागण
मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे ट्विटर अकाउंटही ब्लॉक
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव प्रणव झा यांनीही काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाउंट बंद झाल्याने निराशा व्यक्त केली आहे. @INCIndia निषेध करत आहे. चुकीच्या गोष्टीविरोधात लढत राहण्यासाठी वचनबद्धता व्यक्त करत आहोत. त्यांनी हे ट्विट केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना टॅग केले आहे. मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे ऑफिशियल अकाउंट बुधवारी ब्लॉक करण्यात आले आहे. नियमभंग केल्याने ही कारवाई केल्याची माहिती मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चरण सिंग साप्रा यांनी दिली आहे.
पीडितेची ओळख उघड केल्याने ट्विटरने राहुल गांधींच्या ट्विटरवर अकाउंटवर केली होती कारवाई
काँग्रेसने म्हटले, की राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद केले आहे. राहुल गांधी हे इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्टेड राहणार आहेत. 6 ऑगस्टला ट्विटरने राहुल गांधींचे ट्विट काढले होते. कारण, त्यांनी दिल्लीमधील बलात्कार पीडितेची ओळख जाहीर केली होती. ही पीडिता अल्पवयीन होती. पोक्सो कायद्यानुसार पीडितेची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
राहुल गांधींचे ट्विटर अकाउंटही बंद झाले होते...
काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील जुना नांगल येथे स्मशान घाटावर 9 वर्षांची मुलगी वॉटर कुलरचे पाणी पिण्यासाठी गेली होती. तेव्हा तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो राहुल गांधी यांनी ट्विट केला होता. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने हे ट्विट काढण्याचे 4 ऑगस्टला आदेश दिले होते. त्यानंतर राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट काही काळापुरते स्थगित करण्यात आले होते. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.