ETV Bharat / bharat

Telangana: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरण : शिक्षणमंत्र्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याच्या सूचना दिल्या - Minister Sabitha Indra Reddy

हैदराबादच्या शाळेत चार वर्षांच्या मुलीवर कथित बलात्काराचे प्रकरण समोर आल्यानंतर तेलंगणाच्या शिक्षणमंत्री सबिता इंद्रा रेड्डी Minister Sabitha Indra Reddy यांनी कठोर पावले उचलली आहेत. शाळेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. Banjara hills Girl Rape Case

Minister Sabitha Indra Reddy
तेलंगणाच्या शिक्षणमंत्री सबिता इंद्रा रेड्डी
author img

By

Published : Oct 21, 2022, 7:09 PM IST

हैदराबाद (तेलंगणा): तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये शाळेत एलकेजीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीसोबत अत्याचार केल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. त्या शाळेची मान्यता रद्द करण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. Banjara hills Girl Rape Case

शिक्षण मंत्री सबिता इंद्रा रेड्डी Minister Sabitha Indra Reddy यांनी हैदराबादच्या डीईओला शाळेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी कोणतीही घटना पुन्हा घडू नये यासाठी शिक्षण, महिला आणि बालकल्याण संचालकांच्या अंतर्गत डीजीआय स्तरावरील अधिकाऱ्यासह एक विशेष टीम तयार केली जाईल. यासोबतच तेथे शिकणाऱ्या मुलांचे अभ्यासाचे नुकसान होऊ नये यासाठी इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शंका दूर करणे ही डीईओची जबाबदारी असल्याचे मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांनी स्पष्ट केले.

एका आठवड्यात अहवाल मागवला : मंत्री सबिता इंद्रा रेड्डी म्हणाल्या की, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. त्या म्हणाल्या की, सरकारला सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही समिती आठवडाभरात अहवाल सादर करेल. मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांनी सांगितले की, अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले उचलली जातील.

असे आहे प्रकरण: बंजारा हिल्स परिसरात असलेल्या डीएव्ही शाळेच्या मुख्याध्यापकाच्या चालकाने चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या मित्रांनी चालक रजनी कुमारला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

शाळेच्या मुख्याध्यापकाचा ड्रायव्हर सुमारे दोन महिन्यांपासून मुलीशी गैरवर्तन करत होता. संतप्त नातेवाईकांनी एकदा शाळेच्या मुख्याध्यापकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी मुख्याध्यापक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती. या प्रकरणी स्थानिक लोकांनी बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात घोषणाबाजीही केली. माजी आमदार रामुलू नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही आंदोलन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.