ETV Bharat / bharat

Nalanda Court Verdict Case : मालमत्ता हडप प्रकरणात बिहार न्यायालयाने दिला 41 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल - property grabbing case in nalanda

कोट्यावधीची संपत्ती हडप केल्याप्रकरणी बिहार शरीफ न्यायालयाने तब्बल 41 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल दिला ( Historic verdict after 41 years ) आहे. न्यायालयाने खोट्या व्यक्तीला दोषी ठरवून त्याला तीन वेगवेगळ्या कलमांतर्गत न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आरोपीला 3 वर्षाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक केलेला आरोपी
अटक केलेला आरोपी
author img

By

Published : Apr 5, 2022, 8:55 PM IST

Updated : Apr 5, 2022, 9:07 PM IST

नालंदा - बिहार शरीफ न्यायालयाचे न्यायमूर्ती मानवेंद्र मिश्रा ( Judge Manvendra Mishra ) यांनी तब्बल ४१ वर्षांनंतर एका खटल्यात ऐतिहासिक निकाल ( Historic verdict after 41 years ) दिला आहे. कोट्यावधीची मालमत्ता हडप करण्याचा कट रचल्याप्रकरणी न्यायालयाने एका व्यक्तीला दोषी ठरवून तीन वेगवेगळ्या कलमांखाली शिक्षा सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल जाणून घेण्यासाठी न्यायालयात लोकांची गर्दी दिसून आली.

प्रतिक्रिया देताना वकील

काय आहे प्रकरण? : बेन पोलीस स्टेशनच्या मुरगवान गावचे जमीनदार कामेश्वर सिंह यांना 7 मुली आणि 1 मुलगा कन्हैया होता. मुलगा कन्हैया 1977 साली वयाच्या 14 व्या वर्षी दहावीची परीक्षा देत असताना चंडी हायस्कूलमधून बेपत्ता झाला होता. आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. चार वर्षांनंतर गावात एक साधू आला. जो स्वतःला कामेश्वर सिंहचा मुलगा कन्हैया सिंग म्हणवू लागला. ज्यानंतर आपल्या मुलाची बातमी ऐकून कामेश्वर सिंहला आनंद झाला आणि त्याला हत्ती घोड्यावर बसवून घरी घेवून गेले. परंतु 4 वर्षानंतर समजले की भिक्षूच्या वेशात आलेला तरुण कन्हैया नसून बेहरूपिया आहे.

बहिणीने भावाला स्वीकारण्यास दिला नकार : हे उघड झाल्यानंतर कामेश्वर सिंहची मुलगी रामसखी देवी हिने त्याला कन्हैया म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर 1981 मध्ये सिलाव पोलीस ठाण्यात मालमत्ता हडप करण्याच्या हेतूने आलेल्या कन्हैयावर बनावट असल्याचा आरोप करत खटला दाखल करण्यात आला. 1981 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर, संशोधनादरम्यान, त्याची ओळख दयानंद गोसाईन अशी झाली. जो तत्कालीन मुंगेर जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील लाखाई गावचा रहिवासी होता. कामेश्वर सिंहच्या 7 मुलींपैकी 6 बहिणी या प्रकरणात फारसा रस घेत नव्हत्या, मात्र एक बहीण रामसखी देवी त्याला कन्हैया म्हणून स्वीकारण्यास नकार देत होती.

आरोपी व्यक्तीला 3 वर्षाची शिक्षा : वकील राजेश पाठक यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याचे सांगितले. मात्र, पुन्हा कनिष्ठ न्यायालयात सुनावणीसाठी पाठवण्यात आली. या प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट आले आहेत. कामेश्वर सिंहची पत्नी आणि मुलगी रामसखी यांनी त्याला कन्हैया म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. जेव्हा त्याची प्रथम ओळख झाली. यानंतर, मालमत्ता हडप केल्याच्या आरोपावरून सिलाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. तब्बल 41 वर्षांनंतर न्यायाधीश मानवेंद्र मिश्रा यांनी दोषी दयानंद गोसाईला भारतीय दंड संहिता 420, 419 आणि 120 नुसार तुरुंगात पाठवले. बनावट व्यक्तीला 3 वर्षे कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - BMC Officer Arrested For Taking Bribe : तीन लाखांची लाच घेताना पालिका अधिकाऱ्याला अटक

Last Updated : Apr 5, 2022, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.