ETV Bharat / bharat

Rape culprit arrested after DNA test: तब्बल 27 वर्षांनी बलात्कार पीडितेला न्याय, डीएनए चाचणीनंतर आरोपीला अटक

उत्तर प्रदेशात शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांवर 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप एका मुलीने केला होता. यानंतर बलात्कार पीडित मुलगी आई झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपीचा डीएनए करवून घेतला (Rape culprit arrested after DNA test). ज्यामध्ये मुलाचा आणि मुलाच्या आईचा डीएनए जुळला आहे. आता पोलिसांनी तब्बल २७ वर्षांनंतर एका आरोपीला अटक केली आहे (After 27 rape victim got justice).

तब्बल 27 वर्षानंतर बलात्कार पीडितेला न्याय

author img

By

Published : Aug 3, 2022, 4:25 PM IST

Updated : Aug 3, 2022, 4:37 PM IST

शाहजहांपूर : 27 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांवर 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. यानंतर बलात्कार पीडित मुलगी आई झाली होती आणि तिने मुलाला जन्म दिला होता. पीडितेने 27 वर्षांपूर्वी बलात्काराची तक्रार दाखल केली होती (Rape culprit arrested after DNA test). त्यामध्ये पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध कलम 452,376(2), आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपीचा डीएनए करवून घेतला. ज्यामध्ये मुलाचा आणि मुलाच्या आईचा डीएनए जुळला आहे. आता पोलिसांनी तब्बल २७ वर्षांनंतर यावरुन एका आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे (After 27 rape victim got justice). या प्रकरणात एका आरोपीला अटक केल्याने बलात्कार पीडित आईला 27 वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दोन तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा - वास्तविक ही घटना 27 वर्षांपूर्वीची आहे. पोलीस स्टेशन सदर बाजार परिसरात राहणाऱ्या एका महिलेने त्याच वस्तीत राहणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेने आरोप केला होता की, जेव्हा ती 12 वर्षांची होती, त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाला. त्यानंतर नकी हसन आणि गुड्डू उर्फ ​​मोहम्मद राझी यांनी याची वाच्याता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ती गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला.

डीएनए चाचणी - पीडितेने आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ४५२,३७६ (२) आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसात डीएनए चाचणीही करण्यात आली होती. ज्यामध्ये डीएनए रिपोर्ट आल्यानंतर पीडित आई आणि मुलाचा डीएनए नकी हसनशी जुळला आहे. सद्यस्थितीत सदर बझार पोलीस स्टेशनला तब्बल 27 वर्षांनंतर या प्रकरणात न्याय देण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी मंगळवारी रात्री बलात्काराचा आरोप असलेल्या गुड्डू उर्फ ​​मोहम्मद राझी याला ईदगाहजवळून अटक करून तुरुंगात पाठवले.

हेही वाचा - Jubilee Hills Gang Rape: पीडितेच्या पालकांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ हटवण्याची केली मागणी

Last Updated : Aug 3, 2022, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.