ETV Bharat / bharat

Haqqani Network Vs India : हक्कानी नेटवर्क भारत आणि अफगानिस्तानच्या मैत्रीत ठरतोय अडथळा; भारताची चिंता वाढली - अफगानिस्तान

हक्कानी नेटवर्कचा नंबर दोनचा दहशतवादी अनस हक्कानीने तीन-चार दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि अब्दुल्ला-अब्दुल्ला यांची काबूलमध्ये भेट घेतली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे कान टवकारले आहेत. अफगानिस्तानचे हक्कानी नेटवर्क भारत आणि अफगानिस्तानच्या मैत्रीत अडथळा ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Haqqani Network Vs India
हक्कानी नेटवर्क
author img

By

Published : Feb 3, 2023, 4:44 PM IST

काबूल (अफगानिस्तान) : पाकिस्तानच्या आयएसआय प्रमाणे भविष्यात हक्कानी नेटवर्क भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. आंतरराष्ट्रीय दहशतवादी अनसला अफगाणिस्तानच्या सरकारने निरपराध लोकांची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर अनस आणि इतर दोन दहशतवाद्यांना 2019 मध्ये तालिबानशी झालेल्या करारामुळे सोडून देण्यात आले होते. याचे कारण, अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाजवळील अत्यंत सुरक्षित परिसरात असलेल्या या इमारतीत नेहमीप्रमाणे सर्व काही सुरू होते. त्यादिवशी व्हिसा आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी भारतीय आणि अफगाण नागरिकांची मोठी गर्दी भारतीय दूतावासाबाहेर जमली होती. तेवढ्यात एक कार भरधाव वेगात आली आणि दूतावासाच्या गेटवर धडकली. यानंतर कारमध्ये मोठा स्फोट झाला आणि त्यात एकूण 58 जणांचा प्राण गमवावे लागले होते. या घटनेमागे हक्कानी नेटवर्कचा हात असल्याचे उघड झाले. हे कारस्थान पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने रचले होते. हक्कानी नेटवर्क ही दहशतवादी संघटना कॅमेऱ्यांसमोर आली आहे.

जलालुद्दीन हक्कानी जनू काही पावर सप्लायर : जागतिक तज्ज्ञांच्या मते जलालुद्दीन हक्कानी हा मूळचा पॉवर सप्लायर होता. त्याने प्रथम अमेरिकेशी व्यवहार केला. नंतर पाकिस्तानशी आणि नंतर अल कायदा आणि तालिबानशी संबंध प्रस्थापित केले. सर्व शक्तिशाली गटांशी त्याचे सलोख्याचे संबध होते. त्यांनी हक्कानी नेटवर्कचे तालिबानमध्ये कधीच विलीनीकरण केले नाही. 3 सप्टेंबर 2018 रोजी जलालुद्दीन हक्कानीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी त्याच्या दहशतवादी संघटनेची कमान सांभाळत आहे.

भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधात यामुळे अडथळा : अनस हक्कानी, माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि अब्दुल्ला-अब्दुल्ला यांची काबूलमध्ये झालेल्या भेटीबाबत अनेक तर्क लावले जात आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानात स्थापन होणाऱ्या तालिबान सरकारच्या सत्तेची धुरा हक्कानी नेटवर्कचा सूत्रधार सिराजुद्दीन हक्कानीकडेच राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेची क्रूरताही भारत आणि अफगाणिस्तानच्या संबंधात अडथळा ठरू शकते. याविषयी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून याचा परिणाम दोन देशांच्या संबंधावर होऊ शकतो.

वझिरिस्तान बनले होते केंद्रस्थान : सोव्हिएत सैन्याने माघार घेतल्यानंतरही हक्कानी नेटवर्कने वझिरीस्तान आणि आजूबाजूच्या भागात सत्ता जमविली. अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतात जन्मलेल्या जलालुद्दीन हक्कानीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघटनेचा बराच विस्तार केला. 1990 पर्यंत सीआयए आणि आयएसआयच्या मदतीने हक्कानी नेटवर्क अफगाणिस्तानातील सर्वांत मजबूत दहशतवादी संघटन म्हणून उदयास आले. त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानचा उदय होत होता. जलालुद्दीन हक्कानी हा पश्तून मुजाहिद्दीनही होता. यामुळेच तालिबानची हक्कानीशी मैत्री झाली आणि दोघेही संपूर्ण देशावर राज्य करू लागले. तालिबान आणि हक्कानी जवळ आल्याने अमेरिकेने यापासून हात झटकले.

जाणून घ्या कशी झाली हक्कानी नेटवर्कची निर्मिती : संघटनेची स्थापना जलालुद्दीन हक्कानी आणि अमेरिकेने केली. 1980 च्या दशकात या संघटनेने उत्तर वझिरीस्तानच्या परिसरात सोव्हिएत सैन्याविरुद्धही युद्ध लढले. जलालुद्दीन हक्कानीला सीआयएने निधी पुरवल्याचा दावा काही अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला होता. सीआयएचे एजंट त्याला शस्त्रे आणि प्रशिक्षण देत असत. तेव्हापासून जलालुद्दीन हक्कानी हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचाही खास होता. खरे तर आयएसआयनेच सीआयएला किती पैसा आणि शस्त्रे कोणत्या मुजाहिदीनला द्यायची हे सांगितले. यामुळे पाकिस्तान हक्कानी नेटवर्कवर अवलंबून आहे. यामुळेच भारताची चिंताही वाढली आहे.

अमेरिकेचा हिरो बनला व्हिलन? अफगाणिस्तानात जलालुद्दीन हक्कानी 2001 मध्ये अमेरिकेसाठी व्हिलन सिद्ध झाला. 9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अल कायदाला लक्ष्य करत दहशतवादाविरुद्ध युद्ध घोषित केले. ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानातील तोरा-बोरा पर्वतांमध्ये लपून बसला असून तालिबान त्याला पाठिंबा देत असल्याची माहिती सीआयएला मिळाली होती. जलालुद्दीन हक्कानी तेव्हा तालिबान सरकारमध्ये अफगाण आदिवासी व्यवहार मंत्री होते. त्यावेळी पाकिस्तानच्या अधिकृत दौऱ्यावर तो इस्लामाबादला आला होता आणि येथून पळून गेला होता. यानंतर हक्कानी हा वझिरिस्तानमध्ये आढळला. त्याने अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. तेव्हापासून अमेरिकेने हक्कानी नेटवर्कला आपला शत्रू संबोधून जलालुद्दीन हक्कानीचा शोध सुरू केला आहे. अजूनही अमेरिका आणि हक्कानी यांच्यातील शत्रुत्व सर्वश्रुत आहे.

हेही वाचा : Mumbai Attack Threat: मुंबईकर भीतीच्या सावटाखाली.. सातत्याने दहशतवादी हल्ल्यांची धमकी.. वाचा वर्षभरात कशा मिळाल्या धमक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.