अयोध्या ( उत्तरप्रदेश ) : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात ( Aaditya Thackeray Ayodhya Visit ) आहेत. त्यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात आदित्य हे भगवान श्रीरामाच्या जन्मस्थळी दर्शन घेणार असून, सायंकाळी अयोध्येतील शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरतीही करणार आहेत. आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. तसेच त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याने दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेतेमंडळी अयोध्येत दाखल ( Sanjay Raut In Ayodhya ) झाली असून, पूर्वतयारीचा आढावा घेत आहेत. अयोध्येत आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद होणार असून, अयोध्येतून केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
'असे' आहे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे राजकीय महत्त्व : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा विरोधामुळे स्थगित करावा लागला. राज ठाकरे यांना कडाडून विरोध करणाऱ्या आयोध्या आणि उत्तर प्रदेश वासियांनी शिवसेना युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मात्र स्वागत केले ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नवीन फायरब्रँड नेते मानले जातात. शिवसेना हि हिंदुत्ववादी संघटना असल्याचा वारंवार उच्चार शिवसेनेकडून केला जातो. बाबरी मशीदीचा ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा हात असल्याचा वारंवार दाखला देत शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे असे सांगून हिंदू मतदारांमध्ये आपले स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न शिवसेना वारंवार करते आहे. शिवसेना गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात आपले उमेदवार उभे करते आहे शिवसेनेच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचवता आले नसले तरी विचाराच्या आधारावर शिवसेना उत्तर प्रदेशात पाय पसरू पाहते आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा त्या अर्थाने फारच महत्वाचा ठरतो. हळूहळू उत्तर प्रदेशात शिवसेना संघटन मजबूत करण्याकडे आदित्य लक्ष देत आहे तर आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबईत असलेली उत्तर भारतीयांची संख्या पाहता हा दौरा त्यादृष्टीने ही शिवसेनेसाठी आणि हिंदुत्ववादी विचारांच्या मतांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
निवडणुकीमुळे बदलली तारीख : 2018 पासून उद्धव ठाकरे तीन वेळा अयोध्येला गेले आहेत. आदित्य ठाकरे आधी १० जूनला अयोध्येला जाणार होते, पण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अयोध्या भेटीची तारीख बदलून १५ जून करण्यात आली होती.
संजय राऊतांनी केली पाहणी : आदित्य ठाकरे 15 जून रोजी दुपारी अयोध्येला पोहोचतील, जिथे ते दर्शन आणि पूजा करण्यासाठी सुमारे 6 तास घालवतील. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता ते उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला रवाना होतील. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या आगमन कार्यक्रमाच्या एक दिवस आधी खासदार संजय राऊत अयोध्येत पोहोचले असून, त्यांनी आदित्य ठाकरे ज्या ठिकाणी भेट देणार आहेत त्या ठिकाणांची पाहणी केली आहे. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमाबाबत ते अद्याप मीडियाशी बोलले नाही. मात्र आदित्य ठाकरेंच्या प्रस्तावित दौऱ्याबाबत त्यांनी प्रदेश कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे.
असा आहे आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या आगमन कार्यक्रमाबाबत महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारला माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे यांचे लखनौच्या चौधरी चरणसिंग विमानतळावर सकाळी ११.०० वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर ते अयोध्येतील हॉटेल पंचशील येथे पहाटे दीड वाजता पोहोचतील. दुपारी साडेतीन वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. शहरातील रामनगर परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिरात दुपारी ४.४५ वाजता पूजा केली जाईल. प्रभू श्रीरामाचे दर्शन सायंकाळी साडेपाच वाजता घेणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती व दुधाचा अभिषेक होईल. त्यानंतर ते लखनऊसाठी रवाना होतील.
महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येकडे रवाना : महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी 1200 शिवसैनिक रेल्वेने अयोध्येला रवाना ( Shiv Sainiks have left for Ayodhya ) झाले असून, ते मंगळवारी सायंकाळपर्यंत अयोध्येत पोहोचतील. शिवसैनिकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था अयोध्येतील सर्व हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्येतील सर्व हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. याशिवाय अयोध्या शहरालगतच्या सीमावर्ती जिल्ह्यांतील हॉटेल्समध्येही बुकिंग करण्यात आले आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्याची घोषणा केली होती, मात्र सर्व विरोधामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. राज ठाकरेंच्या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेनेही आदित्य ठाकरेंना अयोध्येला पाठवण्याची चर्चा केली होती आणि त्याच भागात आदित्य ठाकरे हरिद्वारमध्ये पूजा करण्यासाठी येत आहेत.
हेही वाचा : Aditya Thackeray Ayodhya Tour : आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला फायदा