ETV Bharat / bharat

भाजपचे स्टार प्रचारक मिथून चक्रवर्ती प्रचारादरम्यान पडले आजारी - Actor Mithun Chakraborty news

उन्हाळ्यातील वाढते तापमान आणि शरीरातील पाण्याचे कमी झालेले प्रमाण या कारणांनी मिथून चक्रवर्ती यांना बरे वाटत नसल्याचे सूत्राने सांगितले. त्यांना रायगंज येथून हेलिकॉप्टरने कोलकात्यात आणण्यात आले आहे

Mithun Chakraborty
मिथून चक्रवर्ती
author img

By

Published : Apr 19, 2021, 3:16 AM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक मिथून चक्रवर्ती हे निवडणूक प्रचारादरम्यान आजारी पडले आहेत. भाजपमधील सुत्राच्या माहितीनुसार मिथून चक्रवर्ती हे रायगंज येथील भाजपचे उमेदवार कृष्णा कल्याणी यांच्या विजयासाठी रोड शो करत होते.

उन्हाळ्यातील वाढते तापमान आणि शरीरातील पाण्याचे कमी झालेले प्रमाण या कारणांनी मिथून चक्रवर्ती यांना बरे वाटत नसल्याचे सूत्राने सांगितले. त्यांना रायगंज येथून हेलिकॉप्टरने कोलकात्यात आणण्यात आले आहे. कोलकात्यामध्ये डॉक्टरांनी त्यांना तपासले आहे. मिथून चक्रवर्ती यांना डॉक्टरांनी २४ तास निगराणीखाली ठेवले आहे. डॉक्टरांनी मिथून यांना विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे.

हेही वाचा-अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी वाय प्लस सुरक्षा

दरम्यान, बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सरच्या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी मार्च २०१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये केला आहे.

हेही वाचा-मिथुन चक्रवर्ती यांच्या रोड शोला परवानगी नाकारल्याबद्दल भाजपचे आंदोलन

मिथून चक्रवर्ती राज्यसभेत टीएमसीकडून खासदार होते -

२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मिथून चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसमधून पश्चिम बंगालकडून राज्यसभेत खासदार राहिले आहेत. मात्र ते राजकारणात फार रमत नसल्याचे दिसत होते. शारदा चिट फंड प्रकरणात नाव आल्याने अवघ्या दोन वर्षातच त्यांनी राज्यसभा सभागृहाचा राजीनामा दिला. मिथून चक्रवर्ती हे सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. गेली अनेक वर्षे सेलिब्रेटी राहिल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.