ETV Bharat / bharat

Sunny Deol Missing Poster : सनी देओल बेपत्ता! अभिनेत्याच्या मतदारसंघात लागले पोस्टर्स, 'हे' आहे कारण - सनी देओल गायब झाल्याचे पोस्टर

2021 मध्ये खासदार सनी देओल यांनी सुजानपूर मतदारसंघातील रस्ते बांधणीचे उद्घाटन केल्यानंतर अजूनही तो रस्ता प्रत्यक्षात बांधला गेला नाही. याचा निषेध म्हणून आता स्थानिक लोकांनी उद्घाटनाच्या पट्टीवर सनी देओल गायब झाल्याचे पोस्टर लावले आहेत. स्थानिक लोकांनी पंजाबच्या आप सरकारला या रस्त्याचे बांधकाम लवकर सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

Sunny Deol Missing Poster
सनी देओल गायब झाल्याचे पोस्टर
author img

By

Published : Jan 12, 2023, 6:29 PM IST

पठाणकोट (पंजाब) : गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुजानपूरचे माजी आमदार दिनेश सिंह बब्बू आणि भाजप खासदार सनी देओल यांनी सुजानपूर मतदारसंघात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एका रस्त्याचे उद्घाटन केले होते. मात्र, बराच काळ लोटूनही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी आता उद्घाटनाच्या पट्टीवर खासदार सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावले आहेत!

Sunny Deol Missing Poster
सनी देओल गायब झाल्याचे पोस्टर

स्थानिक लोकांचा आणि आप कार्यकर्त्यांचा आरोप : रस्त्याचे काम सुरू न झाल्याने नेत्यांनी मते मिळवण्यासाठी मोठमोठी आश्वासने दिली. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर लोकप्रतिनिधींकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि आप कार्यकर्त्यांनी केला आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे.

निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने, प्रत्यक्षात काहीच नाही : आप कार्यकर्त्यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती, परंतु सनी देओलने निवडणूक जिंकल्यानंतर सुजानपूर मतदारसंघात काही एक काम केले नाही. ते म्हणाले की, सनी देओल आणि माजी आमदार दिनेश यांनी 2021 मध्ये प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या बांधकामाचे उद्घाटन केले. भूमीपूजन करून ते येथून निघून गेले, मात्र त्यानंतर सनी देओल किंवा भाजपचे अन्य कार्यकर्ते कुठेच दिसले नाहीत. ते म्हणाले की या कारणासाठी आम्ही सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावले आहेत.

रस्त्याची अवस्था वाईट, रोज अपघात होतात : स्थानिक रहिवासी राजेश म्हणाले की, रस्त्याची अत्यंत दुरवस्था आहे. पाऊस पडला की येथे डबके तयार होतात. रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. सुजानपूरकडे त्यांचे लक्ष नसल्याने कोणतेही सरकार त्याकडे लक्ष देत नाही. राजेश म्हणाले की, काँग्रेस असो, भाजप असो, अकाली दल असो, किंवा आम आदमी पक्ष असो, कोणीही रस्ते बनवत नाही. सुजानपूर मतदारसंघातील या रस्त्याच्या कामाला गती द्यावी, जेणेकरून जनतेला दिलासा मिळेल, असे आवाहन त्यांनी विद्यमान सरकारकडे केले आहे.

हेही वाचा : Gadar 2 First Look : 'गदर 2' मध्ये सनी देओलची दमदार स्टाईल पुन्हा दिसणार, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.