चामराजनगर (कर्नाटक) : पोलिस जीपमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपीचा जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी चामराजनगर येथे घडली. याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (accused jump out of police jeep and dies).
यलंदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : यलांदूर सीपीआय शिवमदिया, मांबल्ली पोलिस स्टेशनचे पीएसआय मेडे गौडा आणि कॉन्स्टेबल सोमन्ना यांच्याविरुद्ध यलंदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताची आई महादेवम्मा यांनी आपल्या मुलावर अत्याचार करून खून केल्याचा आरोप करत फिर्याद दिली आहे.
अल्पवयीनेला पळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता : 23 नोव्हेंबर रोजी यलंदूर तालुक्यातील कुंटुरुमोले गावातील निंगाराजू (21) याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी पोलीस त्याला घेऊन पोलीस ठाण्यात आले असता आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. जीपमधून उडी मारून तो गंभीर जखमी झाला. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.