ETV Bharat / bharat

राज्यात मोसमी पाऊस जोरदार बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

यंदा राज्यात मोसमी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज देऊन एक दिवस होत नाही तोवर आता मोसमी पावसाच्या राज्यातील प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत.

heavy rains
heavy rains
author img

By

Published : Jun 2, 2022, 7:44 AM IST

मुंबई - यंदा राज्यात मोसमी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज देऊन एक दिवस होत नाही तोवर आता मोसमी पावसाच्या राज्यातील प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत. अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे दोन दिवसांत तळकोकणात दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला. दरम्यान, राज्याच्या काही भागांत बुधवारी अवकाळी पाऊस झाला आहे.

मोसमी पावसाने २९ मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला. अनुकूल स्थितीमुळे अतिशय वेगाने त्याने प्रवास सुरू केला आहे. त्यामुळेच मोसमी पाऊस कोकण आणि गोव्यात वेळेआधीच पोहचण्याची चिन्हे असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, कोकणाबरोबरच मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटकाचा काही भाग, तामिळनाडूचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम, पश्चिम मध्य, ईशान्य भागासह देशाच्या ईशान्य काही राज्ये, सिक्कीम, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या काही भागातही दोन दिवसांत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.

उत्तर बंगालचा उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. यामुळे हवेचा वेग वाढला आहे. बंगालच्या उपसागरापासून ते ईशान्य भारतातील काही राज्यापर्यत जोरदार वारे वाहणार आहेत. चक्रीय स्थितीमुळे आसाम, मेघालय, हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम अरूणाचल प्रदेश, या भागात अतिवृष्टी होणार आहे.

राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, परभणी या भागात वादळीवारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा - Vegetables: पालेभाज्यांचे दरही कडाडले; आवक कमी झाल्याचा झाला परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.