बेंगळुरू ( कर्नाटक ) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी सकाळी राज्यातील अधिकाऱ्यांना धक्का दिला. एसीबीच्या 300 अधिकाऱ्यांच्या पथकाने राज्यभरात 80 ठिकाणी 21 कथित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर छापे टाकले ( ACB raids 21 government officials houses ) आहेत. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी सहाच्या सुमारास विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे ( Bangalore ACB raid ) टाकले.
त्यांच्या मिळकतीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या मालमत्तेवर छापेमारी, सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी कागदपत्र पडताळणी सुरू आहे. एसीबीने बंगळुरूसह 10 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले.
RTO, सर्कल पोलिस निरीक्षक, PWD अभियंते, नोंदणी अधिकारी आणि पंचायत सचिवांसह 21 अधिकाऱ्यांवर छापे टाकते. याप्रकरणी काही माहिती हाती लागते का याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. एसीबी सविस्तर माहिती नंतर जाहीर करणार आहे.
हेही वाचा : Nupur Sharma : नुपूर शर्माची जीभ कापल्यास १ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा करणारा आरोपी अटकेत