नवी दिल्ली आपच्या आमदार Aap Mla Atishi Marlena आतिशी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशभरातील भाजपच्या ऑपरेशन लोटसवरील BJP Operation Lotus कोटींच्या खर्चाची सीबीआय चौकशी Aatishi Marlena Demands Cbi Inquiry व्हावी, अशी मागणी केली. आम आदमी पक्षाचं एक शिष्टमंडळ यासंदर्भात सीबीआय कार्यालयात जावून निवेदन देणार असल्याच त्यांनी सांगितलं.
काय म्हणाल्या आतिशी मार्लेना ? केवळ दिल्लीतचं नाही तर गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातही भाजपने सरकार स्थापनेसाठी घोडेबाजार केला आहे. भाजपने आतापर्यंत 270 आमदार फोडून वेगवेगळ्या राज्यात सरकारं स्थापन केली आहेत. आमदार फोडण्यासाठी भाजपकडे 6000 कोटी रुपये आले कुठून ? महाराष्ट्रात खोके-खोकेची घोषणा का दिली गेली ? हे कुणापासून लपलेले नाही. त्यामुळे सीबीआय आणि अन्य तपास यंत्रणांनी त्याची चौकशी करावी. अस मार्लेना म्हणाल्या.सीबीआयकडे वेळ मागितला असून, अद्यापही वेळ दिला गेला नसल्याचा आरोप आमदार आतिशी मार्लेना यांनी केला आहे. सीबीआयने भाजपच्या बाबतीत चौकशी करताना तत्परता दाखवायला हवी, अस त्या म्हणाल्या.
भाजपकडून लोकशाहीला धोका Threat to Democracy From BJP संपूर्ण देशाने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला. 75 वर्षात आपल्या देशात लोकशाही टिकून आहे याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष भाजपकडून भारताची लोकशाही धोक्यात India democracy under threat आली आहे. एखाद्या राज्यात भाजपने निवडणूक हरली की दुसऱ्या पक्षाचे सरकार बनते, तेव्हा तिथे भाजपचे घोडेबाजाराचे कामकाज सुरू होते. भाजपने आतापर्यंत ऑपरेशन लोटस अंतर्गत 277 आमदार विकत घेतले आहेत. जर आपण दिल्लीतील 277+40 आमदारांची गणना केली तर भाजपने 6300 कोटी रुपये खर्च केले आहेत.
भाजपचा देशभर घोडेबाजार संजीव झा यांचा आरोप भाजपने आतापर्यंत 270 हून अधिक आमदार फोडून वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपले सरकार स्थापन केले आहे. इतके आमदार फोडण्यासाठी भाजपकडे 6000 कोटी रुपये आले कुठून ? असा सवाल संजीव झा यांनी उपस्थित केला. Aap Mla Atishi Marlena Demands Cbi Inquiry Rs 6300 crore Expenditure On BJP Operation Lotus across the country
हेही वाचा Income Tax Raid मोठी कारवाई, लखनऊ, कानपूरसह 22 ठिकाणी आयकर विभागाचे छापे