चंदीगड Person Killed In Gurudwara : गुरुद्वारा अपवित्र करण्यासाठी आलेल्या तरुणाचा खून करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना पंजाबमधील फगवाडा इथल्या गुरुद्वारा चौदा शुह साहिब इथं घडली आहे. इथल्या निहांग सिंगनं तरुणाचा खून केला. गुरुद्वारा अपवित्र करण्यासाठी आल्याच्या संशयावरुन या तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती फगवाड्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. घटना उघडकीस येताच काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
धर्म ग्रंथाबाबत बोलले वाईट शब्द : तरुणाचा खून केल्याच्या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार "रात्री दहा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती गुरुद्वाच्या बाथरूममध्ये लपून बसला होता. गुरुद्वाराचे प्रशासक बाथरूममध्ये गेले असता, आतून कोणीतरी दरवाजा बंद केला. त्यानंतर दरवाजा ठोठावण्यात आल्यानंतर तरुणानं भांडण सुरू केलं. त्यानंतर झालेल्या झटापटीत खुनाची घटना घडली."
कोणीतरी पैसे देऊन पाठवलं तरुणाला : गुरुद्वारा अपवित्र करण्यासाठी या तरुणाला कोणीतरी पैसे देऊन पाठवण्यात आल्याचा दावा इथल्या सेवकानं केला. त्यामुळं त्यानं खून होण्याच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सोशल माध्यमात प्रचंड व्हायरल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तरुणानं निहांग सिंगला धर्म ग्रंथाबद्दल वाईट शब्द बोलल्यानं त्यानं तरुणाचा खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुरुद्वारा अपवित्र करण्यासाठी घुसला होता तरुण : सोशल माध्यमांवर या तरुणानं बनवलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा तरुण अपवित्र उद्देशानं गुरू घरात घुसल्याची कबुली देत आहे. गुरुद्वारा अपवित्र करण्यासाठी कोणीतरी पैसे दिल्यानं त्यानं हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :