अमृतसर (पंजाब): Pakistani Drone Downed: पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात पाकिस्तानच्या हद्दीतून भारताच्या हद्दीत घुसलेले ड्रोन सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाडले BSF Troops Downed Pakistani Drone आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानकडून एक ड्रोन येताना दिसला. ज्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या. बीएसएफकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. Amritsar Border of India
गेल्या महिन्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सर्व महिलांच्या पथकाने पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात पाकिस्तानमधून सीमेवर घुसलेला ३.१ किलो अमली पदार्थ वाहून नेणारा ड्रोन पाडला आणि सीमापार अंमली पदार्थांची तस्करी उधळून लावली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएसएफच्या जवानांनी रात्रीच्या वेळी अमृतसर शहराच्या उत्तरेला सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या चहारपूर गावाजवळ ड्रोन भारतीय हद्दीत प्रवेश करताना पाहिले.
त्यांनी सांगितले की, 73 बटालियनच्या दोन महिला कॉन्स्टेबलने ड्रोनवर 25 गोळ्या झाडल्या आणि रात्री 11.55 वाजता तो पाडला. शोध मोहिमेदरम्यान, बीएसएफला सहा रोटर (विंग) मानवरहित वाहन 'हेक्साकॉप्टर' अंशतः खराब झालेल्या अवस्थेत सापडले. त्यांनी सांगितले की, 18 किलो वजनाच्या ड्रोनमध्ये 3.11 किलो अमली पदार्थ ठेवण्यात आले होते, जे त्याखाली एका पांढऱ्या रंगाच्या पॉलिथिनमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते.