पणजी - गोव्याच्या किनार्यावर एक मिग 29 के लढाऊ विमान तळावर परतत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे समुद्रात कोसळले. पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आले. जलद शोध आणि बचाव कार्यात त्याला बाहेर काढण्यात आले आहे. पायलटची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. ( MiG 29K Fighter Aircraft Crashed )
चौकशी मंडळ स्थापन्याचे आदेश : गोव्याच्या किनारपट्टीवर MiG-29K विमान कोसळल्याची माहिती नौदलाला मिळाली आहे. MiG-29K लढाऊ विमान नियमित सराव उड्डाण करत होते. तळावर परतत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. यातून पायलट सुरक्षित बचावला आहे. नौदलाने शोध मोहीम राबवून वैमानिकाची सुटका केली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी चौकशी मंडळ स्थापन्याचे आदेश देण्यात आले आहेत.
iG-29K चा हा चौथा अपघात : नोव्हेंबर 2020 मध्ये MiG-29K च्या क्रॅशनंतर एका लढाऊ वैमानिकाचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर लगेचच एका वैमानिकाला वाचवण्यात आले होते. तर कमांडर निशांत सिंगचा मृतदेह अपघातानंतर 11 दिवसांनी सापडला होता. त्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये पक्ष्यांच्या धडकेने MiG-29K क्रॅश झाले होते. यात दोन्ही वैमानिकांनी बाहेर पडण्यापूर्वी जेटला वस्तीपासून दूर नेले होते. या कृतीमुळे वैमानिकांचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक ( Union Minister of State for Defense Shripad Naik ) यांनी कौतुक केले. त्याहीपुर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये, MiG-29K ट्रेनर विमान गोव्यातील एका गावाबाहेर कोसळले होते. या अपघातातून दोन्ही पायलट सुखरूप बचावले होते.